जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Video : मुंबईच्या बाजारात संक्रातीचा उत्साह, खरेदीसाठी महिलांची लगबग!

Video : मुंबईच्या बाजारात संक्रातीचा उत्साह, खरेदीसाठी महिलांची लगबग!

Video : मुंबईच्या बाजारात संक्रातीचा उत्साह, खरेदीसाठी महिलांची लगबग!

Makar Sankrant 2023: मकर संक्रातीचा सण आता काही तासांवर येऊन ठेपलाय. संक्रातीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी सध्या मुंबईतील बाजारपेठ सजली आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 14 जानेवारी : मकर संक्रातीचा सण आता काही तासांवर येऊन ठेपलाय. महिला वर्गामध्ये संक्रातीचं विशेष महत्त्व असतं. या निमित्तानं काही महिला महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी पाच, सात, अकरा, एकवीस याप्रमाणे महिलांना बोलावून वाण देण्यात येते. वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणे. अनेक घरातील महिला संक्रांतीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या महिलांना भेटवस्तू देत असतात. संक्रातीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी सध्या मुंबईतील बाजारपेठ सजली आहे. बाजारात विशेष काय? नववधू आणि मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार यंदा पाहायला मिळत आहेत. पारंपारिक हार, कानातले, बाजूबंद, गळ्यातल्यासोबत बांगड्या, पाटल्या, तोडे यामध्ये वेगळेपण दिसून येते. लहान मुलांच्या दागिन्यामध्ये बासरी, मुकुट यासह हातातली वाळी, कडे, गळ्यातले हारही उपलब्ध आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    कोरोना निर्बंधामुळे दोन वर्ष बंद असलेली बाजारपेठ यंदा चांगलीच सजली आहे. मकर संक्रातीनिमित्त वेगवेगळ्या गोष्टी बाजारात येत असून त्या खरेदी करण्यासाठी आम्ही बाजारात आलो आहोत. माझी यंदा पहिलीच संक्रांत असल्यानं वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून सुंदर दिसावं यासाठी प्रयत्न सुरू आहे,’ अशी प्रतिक्रिया खरेदीसाठी आलेल्या महिला ग्राहकाने व्यक्त केली. Makar Sankranti 2023 Ukhane : पहिल्या संक्रांतीची तयारी खास, सुंदर मराठी उखाणे स्मार्ट सूनेसाठी ‘महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी खास वैशिष्टय असलेल्या वस्तू आहेत. दोन वर्षानंतर आणि या वर्षातला पहिला सण असल्यामुळे लोकं गर्दी करत आहेत. यंदा जास्त दर वाढविण्यात आलेले नाही. लहान मुलांच्या गोष्टी १०० रुपयांपासून सुरुवात असून मुलींचे २०० रुपयांपासून घेणार तसा दर आहे. अनेक व्हरायटी उपलब्ध असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.’ अशी प्रतिक्रिया गीता अलंकाराच्या मालकांनी दिली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात