भारतात जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस देण्यासाठी धडपड सुरू आहेत. आपल्या राज्यात जास्त लोकांना कोरोना लस मिळावी यासाठी राज्य सरकारही प्रयत्न करत आहे.
2/ 6
देशातील सर्वात जास्त लसीकरण झालं आहे ते उत्तर प्रदेशात. सरकारच्या आकडेवारीनुसार यूपीमध्ये सर्वाधिक 10,39,43,392 कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 7,93,79,380 कोरोना डोस देण्यात आले आहेत.
3/ 6
एकूण लसीकरणात उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर असला तरी महाराष्ट्राच्या पिछाडीवरच आहे. कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
4/ 6
उत्तर प्रदेशात 8,42,71,713 नागरिकांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर फक्त 1,96,71,679 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महाराष्ट्रात 5,61,69,564 नागरिकांनी पहिला तर 2,32,09,816 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
5/ 6
उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात एकूण डोस आणि पहिल्या डोस घेणाऱ्यांचं प्रमाण कमी असलं तरी दुसरा डोस घेणाऱ्यांचं म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्यांचं प्रमाण मात्र जास्त आहे.
6/ 6
एकूण डोसपैकी दुसऱ्या डोसची टक्केवारी ही उत्तर प्रदेशात 18.93 आहे पण महाराष्ट्रात यापेक्षाही जास्त 29.24 आहे.