अहमदाबाद : गुजरात हे ‘ड्राय स्टेट’ आहे. म्हणजेच संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्यात आलेली आहे. मात्र, वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचं दिसत आहे. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये सुमारे 30 ते 40 टक्के किंवा एक तृतीयांशांपेक्षा जास्त लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया अल्कोहोल-संबंधित गुंतागुंतांमुळे कराव्या लागत आहेत. गुजरात युनिव्हर्सिटी ऑफ ट्रान्सप्लांटेशन सायन्सेसचे (जीयूटीएस) कुलगुरू आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचे प्रमुख डॉ. प्रांजल मोदी यांनी अलीकडेच 600 लिव्हर ट्रान्सप्लांटेशन शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. ते म्हणाले, “आमच्याकडे अल्कोहोल आणि नॉन-अल्कोहोलिक स्टिटोहिपॅटायटिसमुळे होणाऱ्या लिव्हर सिरॉसिसची कोणतीही वर्गवारी नसली तरी, या दोन्ही परिस्थितींमुळे सुमारे 70 ते 75 टक्के प्रकरणांमध्ये लिव्हर निकामी झालेलं होतं असं लक्षात आलं. उर्वरित प्रकरणं, हिपॅटायटिससारख्या विषाणूजन्य आणि संसर्गजन्य रोगांमुळे उद्भवलेली होती.” डॉ. मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिव्हर निकामी होणाऱ्या रुग्णांच्या सामाजिक-आर्थिक स्तरामध्ये फारसा फरक नाही. यामध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. 600 लिव्हर ट्रान्सप्लांटेशनपैकी, 532 शस्त्रक्रियांसाठी देहदानाद्वारे लिव्हर मिळाली आहेत.
Morning Routine : सकाळी घ्या ही 3 पेयं, रक्तातील विषारी पदार्थांसोबत किडनी फिल्टरमधील घाणही काढतील बाहेर!समोर आलेल्या डेटामध्ये असं म्हटलं आहे की, लिव्हरशी संबधित आजारांनी रुग्णालयात दाखल होण्याचं सध्याचं वय सिरॉसिससाठी 40 ते 45 वर्षे आणि एनएएसएचसाठी 50 वर्षे आहे. म्हणजेच कमी वयात लिव्हरशी संबंधित आजार होत आहेत. एकूण ट्रान्सप्लांटेशनपैकी सुमारे 57 टक्के शस्त्रक्रिया गेल्या तीन वर्षांत झाल्या आहेत. 2022 मध्ये 186 ट्रान्सप्लांटेशन्स झाली आहे. इतर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन सर्जन्स आणि हिपॅटॉलॉजिस्ट अल्कोहोलमुळे होणाऱ्या यकृताच्या आजारांवर भर देतात. शहरातील वरिष्ठ जीआय आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन सर्जन डॉ. हितेश चावडा यांच्या टीमनं आतापर्यंत 33 लिव्हर ट्रान्सप्लांटेशन केली आहेत. त्यांच्या मते, गुजरातमध्ये दारूचं सेवन आणि खराब जीवनशैली यकृत निकामी होण्यासाठी समान प्रमाणात कारणीभूत आहे. या दोन घटकांमुळे, लिव्हर खराब होण्याची 60 ते 70 टक्के प्रकरणं समोर आली आहेत. तर, उर्वरित प्रकरणं हिपॅटायटिस, ट्युमर आणि इतर कारणांमुळे होतात.
Health Tips : शरीरात जास्त प्रोटीन झाल्याने होऊ शकतो मृत्यू? दिवसाला किती प्रोटीन घेणे आहे योग्यशहरातील हिपॅटॉबिलरी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन सर्जन डॉ. भाविन वसावडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडे ट्रान्सप्लांटेशन न केलेल्या प्रकरणांमध्ये एका 28 वर्षांच्या तरुणाचा समावेश होता. त्याला अल्कोहोलिक हिपॅटायटीसचं निदान झालं होतं. त्याला कावीळ झाली होती आणि तीव्र जळजळची समस्या होती. अचानक अल्कोहोल घेतल्यानं त्याला आयसीयूमध्ये आणलं गेलं होतं. डॉ. वसावडा म्हणाले, “तरुणाचं यकृत निकामी होण्यापासून वाचवण्यात आलं. आधारभूत गोष्ट अशी आहे की, जर एखाद्या व्यक्तीनं प्रमाणाबाहेर अल्कोहोल घेतलं तर त्याचा बिलीरुबिन लेव्हलवर गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला क्रॉनिक लिव्हर डिसीज नसतानाही आयसीयूमध्ये ठेवावं लागतं किंवा ऑपरेशन करावं लागू शकतं.”
फॅटी लिव्हर डिसीजेसऐवजी स्टिटोटिक लिव्हर डिसीजशी (एमएएसएलडी) संबंधित आणि व्याप्ती वाढणाऱ्या चयापचयच्या नवीन टर्मिनॉलॉजिकडेही त्यांनी लक्ष वेधलं. “जर एखाद्या व्यक्तीला डायबेटिस आणि उच्चरक्तदाबाचा धोका असेल तर ते त्याला लिव्हर डिसीज होण्याचा धोका असू शकतो. हा आजार वाढण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो म्हणून, जीवनशैलीत बदल करणं आणि सुरुवातीलाच तो रोखणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे,” असं डॉ. वसावडा म्हणाले. शहरातील एका वरिष्ठ लिव्हर ट्रान्सप्लांटेशन सर्जननं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, बेसुमार मद्यसेवन हे यकृताच्या आजारांचं प्रमुख कारण आहे. काहीजण नियमित दारू पितात आणि कधी-कधी अचानक त्याचं दारू पिण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यांचं लिव्हर तितक्या तत्परतेने ते सहन करू शकत नाही आणि विचित्र लक्षणं दाखवतं. शिवाय, अजूनही आपण किती दारू पितो, याबद्दल लोक स्पष्टपणे बोलत नाहीत. त्यामुळे दारू पिण्याची सवय आणि गरिबी या दोन्हीमुळे लिव्हरचा आजार होणं हे काही नवं नाही, असं या सर्जननं सांगितलं. शहरातील हिपॅटॉलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन फिजिशियन डॉ. पथिक पारिख म्हणाले की, राज्यात मद्यपान आणि फॅटी लिव्हर या दोन्हीमुळे यकृताच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. “आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये जे रुग्ण पाहतो त्यापैकी 75 टक्के रुग्ण हे दोन्ही प्रकारचे असतात. अल्कोहोलचं सेवन वाढलं आहे आणि असे रुग्ण क्रॉनिक लिव्हर डिसीजेस असलेल्या रुग्णांच्या तुलनेत वयाने तरुण आहेत,” असंही ते म्हणाले.