भारतासह जगभरातील आहारात प्रोटिनचा खूप वापर केला जातो. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार लंडनमध्ये राहणाऱ्या 16 वर्षांच्या रोहन गोधनियाचा प्रोटिन शेक प्यायल्याने मृत्यू झाला. शरीरात प्रोटिनचं प्रमाण वाढल्याने त्याला ऑर्निथिन ट्रान्सकार्बामायलेज नावाचा दुर्मिळ आजार झाला होता. प्रोटिन पावडरचे फायदे, नुकसान, प्रकार यासह इतर गोष्टी जाणून घेऊयात. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्समध्ये पॅकेज्ड फुड्स विभागाच्या अध्यक्षा दीपिका भान यांनी मागच्या वर्षी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार भारतात प्रोटिन सप्लिमेंट मार्केटची व्हॅल्यू 3-4 कोटी रुपये आहे आणि येत्या काळात ती आणखी वाढेल. FSSAI च्या एका रिचर्सनुसार भारतात विकले जाणारे जवळपास 15 टक्के प्रोटिन पावडर व डाएटरी सप्लिमेंट असुरक्षित आहेत. प्रोटिन पावडर काय आहे? हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या माहितीनुसार, झाडं, अंडी किंवा दुधापासून मिळणारी कोरी पावडर म्हणजे प्रोटिन पावडर होय. यात साखर, कृत्रिम स्वाद, व्हिटॅमिन, एन्झाइम, मिनरल्स व आवश्यक अमिनो अॅसिड असतात. मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रोटिन पावडरमध्ये एका स्कूपमध्ये 5 ते 35 ग्रॅम प्रोटिन असू शकतं. मसल्स वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी व वर्कआउटनंतर मसल्स रिकव्हरीसाठी याचा वापर सर्वाधिक होतो.
प्रोटिन पावडरचे फॉर्म प्रोटिन कॉन्सन्ट्रेट : हे प्रोटिन अमिनो अॅसिड, हीट व एन्झाइम्स वापरून बनवलं जातं. यात 60-80 टक्के प्रोटिन, 20-40 टक्के फॅट व कार्बोहायड्रेट असते. हे भारतात सर्वाधिक विकलं जाणारं प्रोटिन आहे. ब्रँडनुसार याच्या दोन किलोची किंमत 4-6 हजार दरम्यान असते. प्रोटिन आयसोलेट्स : हे प्रोटिन कॉन्सन्ट्रेटपेक्षा जास्त फिल्टर करून बनवलं जातं, त्यामुळे फॅट व कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी होतं. प्रोटिन आयसोलेट पावडरमध्ये 90-95 टक्के प्रोटिन असतं. याच्या दोन किलोची किंमत 6-8 हजारदरम्यान असते. प्रोटिन हायड्रोलाइज्झ्ड : हे सर्वांत शुद्ध प्रोटिन आहे. हे प्रोटिन शरीर लवकर शोषतं. यामध्ये 100 टक्के प्रोटिन असतं. याच्या दोन किलो पावडरची किंमत 8-12 हजार दरम्यान असते. प्रोटिन पावडरचे प्रकार 2018च्या एका रिसर्चनुसार अनेक प्रोटिन पावडर शिसे, कॅडमियम, आर्सेनिकसारखे धातू असतात, त्यामुळे खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. विश्वासार्ह दुकानातूनच पावडरची खरेदी करावी. Health : डाएट करताना तुम्ही हे ड्रिंक तर पीत नाही ना? अन्यथा होऊ शकतो कँसर व्हे प्रोटिन : हे जगात सर्वाधिक विकलं जाणारं प्रोटिन आहे. पनीर बनवण्याच्या प्रोसेसनमध्ये निघणाऱ्या पाण्यापासून ते बनवलं जातं. यात जेवणातून मिळणारं अमिनो अॅसिड असतं, हे अर्ध्या तासात पचतं, यात लॅक्टोज असतं. दूध न पचणाऱ्यांनी याचं सेवन टाळावं. मसल्स रिकव्हरी, भूक कमी करणं, मसल्सची सूज कमी करणं व बॉडी कंपोझिशन सुधारण्यासाठी हे फायद्याचं आहे. 2021 मधील एका अभ्यासानुसार व्हे प्रोटिनमुळे सोयापेक्षा लवकर मसल्स रिकव्हरी होते. कॅसिन प्रोटिन : कॅसिन पावडर दुधापासून बनते, यात ग्लुटामाईन अमिनो अॅसिडचं प्रमाण जास्त असतं. हे एक्सरसाईजनंतर मसल्स रिकव्हरी लवकर करतं. हे प्रोटिन रात्री घेणं जास्त फायद्याचं आहे. कॅसिन प्रोटिनने भूक कमी लागते. पी प्रोटिन: हे व्हे व कॅसिन प्रोटिन पचवू न शकणाऱ्यांसाठी आहे. हे झाडांपासून वाटाणे किंवा सोयापासून बनवलं जातं. यात फायबरचं प्रमाण खूप असतं, शिवाय सर्व नऊ अमिनो अॅसिड्सही असतात. 2015 च्या अभ्यासानुसार, हे व्हे व कॅसीनपेक्षा लवकर पचतं. एग प्रोटिन : हे अंड्यातील पांढऱ्या भागापासून बनवलं जातं. यात फॅट नसल्याने पोट भरल्यासारखं वाटत नाही, पण त्यात शरीर बनवू शकत नसलेले सर्व अमिनो अॅसिड असतात. यामध्ये आढळणारं ल्युसीन मसल्स रिकव्हरीसाठी फायद्याचं आहे. एका रिसर्चनुसार, जेवणाआधी एग प्रोटिन घेतल्यास कॅसीन किंवा पी प्रोटिनच्या तुलनेत कमी भूक लागते. हेम्प प्रोटिन : भांग प्रोटिन पावडरला प्लांट प्रोटिन कॅटेगरीत ठेवण्यात आलंय. भांगमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडसह इतर आवश्यक अॅसिड असतात. यात अमिनो अॅसिड लायसीन व ल्युसीन कमी असल्याने हे कम्प्लीट प्रोटिन मानलं जात नाही. इतर प्रोटिन पावडर: मार्केटमध्ये याशिवाय ब्राउन राइस प्रोटिन, मिक्स प्लांट प्रोटिन, सोया प्रोटिन उपलब्ध आहेत, लोक त्यांच्या गरजेनुसार प्रोटिन खरेदी करतात. व्हे प्रोटिनचे सेवन कोण करू शकतं? कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटलमधील क्लिनिकल डाएटिशियन व सीडीई लक्ष्मी मिश्रांच्या मते, ‘प्रोटिन पावडर सर्वांसाठी फायद्याची नसते. तुम्ही प्रोटिनयुक्त डाएट घेत असाल तर पावडरचा फायदा होणार नाही. गरजेपेक्षा जास्त प्रोटिन घेतल्यास ते लघवीवाटे शरीराबाहेर पडतं. एथलिट्स व रोज जिमला जाणारे एक्स्ट्रा प्रोटिन घेऊ शकतात. या शिवाय वृद्ध, आजारी व प्रोटिन कमी असणारे लोक पावडर घेऊ शकतात. Health Tips : डायबिटीजच्या रुग्णांनी पावसाळ्यात घ्या 7 गोष्टींची काळजी, अन्यथा धोका वाढलाच म्हणून समजा प्रोटिन पावडर किती सुरक्षित? लक्ष्मी मिश्रांच्या मते, 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांनी प्रोटिन पावडरचं सेवन टाळावं. पावडर विकत घेताना एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. सामान्य माणसाने 0.8 ग्राम ते 1.2 प्रतिकिलो बॉडी वेट या हिशेबाने प्रोटिन घ्यावं. या पेक्षा जास्त घेतल्यास ते वाया जातं शिवाय किडनीवर दबाव पडतो. अपचन, डिहायड्रेशन, थकवा, मळमळ, डोकेदुखी, जुलाब, वारंवार लघवी येणे ही शरीरात प्रोटिनचं प्रमाण वाढल्याची लक्षणं आहेत, त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. रिसर्चनुसार, प्रोटिनच्या अत्यधिक सेवनाने हृदयाचे आजार, ब्लड व्हेसल्स डिसऑर्डर, लिव्हर-किडनीचे आजार, टाइप 2 डायबेटीस, कॅन्सर व ऑस्टियोपोरोसिससारखे आजार होतात. शिवाय एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. प्रोटिन खरेदी करताना काळजी घ्या सेलेब्रिटी फिटनेस कोच योगेश भटेजांच्या मते, प्रोटिनचे प्रमाण वय, शरीराची गरज व फिटनेस लेव्हलवर डिपेंड करते. सामान्य लोक 0.8 ते 1.2 ग्रॅम प्रतिकिलो बॉडी वेट, अॅक्टिव लाइफस्टाइफ व फिटनेस फ्रीक 1.2 से 1.8 ग्रॅम प्रतिकिलो बॉडी वेट व प्रो लेव्हल अॅथलीट्स 1.5 से 2.2 ग्रॅम प्रतिकिलो बॉडी वेटच्या हिशेबाने प्रोटिन घेऊ शकतात. प्रोटिन पावडर घेताना फिटनेस एक्सपर्टचा सल्ला घ्या. एका वेळी 35 ग्रॅम पेक्षा जास्त प्रोटिन घेऊ नका आणि एकदा घेतल्यावर तीन तासांनीच पुन्हा सेवन करा, असा सल्ला योगेश भटेजा देतात. शिवाय मार्केटमधील चांगल्या ब्रँडचं प्रोटिन घ्या, असंही ते सुचवतात.