पुणे, 11 जुलै: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. तसेच आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक दृष्ट्याही हे महत्त्वाचं शहर आहे. राज्यासह देशभरातून अनेक लोक पुण्यात कामानिमित्त येत असतात. तेव्हा प्रत्येकाला राहण्यासाठी परवडणाऱ्या दरात रिसॉर्ट पाहिजे असतात. पुण्यात अनेक मोठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत. यातील स्वस्तात मस्त 10 हॉटेल्स आपण पाहणार आहोत. 800 रुपयांत करा रूम बूक पुण्यामध्ये राहण्यासाठी अनेक हॉटेल्स रिसॉर्ट उपलब्ध आहेत. अगदी तुम्ही असलेल्या ठिकाणा पासून 5 ते 10 किमीच्या अंतरावर हे हॉटेल्स रिसॉर्ट पाहायला मिळतात. काही तर दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. अगदी 10 ते 15 हजारांच्या दरांतही रिसॉर्ट उपलब्ध आहेत. तसेच सर्वांना परवडणाऱ्या दरात देखील उपलब्ध आहेत. अगदी 700 ते 800 रुपयांतही आपली राहण्याची सोय होऊ शकते.
स्वस्तात मस्त 10 रिसॉर्ट पुण्यात स्वस्तात मिळणाऱ्या काही रिसॉर्टची यादी आहे. आपण आपल्या गरजेनुसार रूम बूक करू शकता. नाना पेठ, लक्ष्मी रोड परिसरात हॉटेल पराग आहे. तर संगमवाडी हॉटेल शिवकृपा, धायरी हॉटेल अवधूत, एरंडवणे हॉटेल कृष्णा प्रेसिडन्सी, डेक्कन जीमखाना हॉटेल सपना, चिंचवड हॉटेल सेलिब्रेशन इन, पुणे शहरात पुणे गेस्ट हाऊस, सोमवार पेठ होटेल राजमंदिर, पुणे शहरात हॉटेल गौरव आणि सिंहगड परिसरात हॉटेल जमजीर प्रेसिडन्सी ही काही स्वस्तात मस्त हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत. कोणत्या सुविधा उपलब्ध? या हॉटेल्समध्ये अतिशय स्वस्त आणि खिशाला परवडणारे भाडे आहे. तसेच सर्व सोयींनीयुक्त, पूर्णपणे सुरक्षित, अतिशय स्वच्छ परीसर, नम्र, विश्वासू आणि मदतशीर कामगार वर्ग ही येथील वैशिष्ट्ये आहेत. तुमच्या सोयीप्रमाणे एसी, नॉन एसी, सिंगल किंवा डबल रूम घेऊ शकता. तसेच जास्त लोकांचा ग्रुप असल्यास त्यानुसार शयनगृहची व्यवस्था सर्व सुख सोयी सोबत उपलब्ध करून देण्यात येते. Pune News: पुण्यात चिकनकारी साड्या घ्यायच्या? हे आहे खास ठिकाण तर नक्की विचार करा पुणे शहराच्या कुठल्याही भागात गेलात तरी ही हॉटेल्स तुम्हाला पाहिला मिळतात. वर पहिल्या प्रमाणे हे हॉटेल हजार रुपये किमतीच्या आत मध्येच उपलब्ध आहे. यामध्ये 24 तास लाईट, पाणी, ट्रान्सपोर्ट अशा सुविधा उपलब्ध आहेत. फिरायला येणाऱ्या किंवा कामानिमित्त येणाऱ्यांसाठी येथे चांगली सुविधा मिळते. त्यामुळेच कधी पुण्यात आलात तर या हॉटेल्सचा नक्की विचार करू शकता.