लायनफिश नावाच्या या माशामध्ये फक्त एका डंकाने मानवाला अर्धांगवायू होण्याची शक्यता असते. कित्येकदा त्याच्या केवळ चाव्यामुळे लोकांनी आपला जीव गमावला आहे.
अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर विविध मासे सापडतात. पर्यटकांनी गजबजलेल्या किनाऱ्यावर हा मासा आढळला तर त्यापासून त्यांना धोका असतो. पंरतु याआधी लायनफिश कोणत्याही ब्रिटिश समुद्रकिनाऱ्यावर दिसली नव्हती. ती आता दिसली आहे.
सागरी जीवांचे अभ्यासक म्हणतात की पकडलेला हा मासा इटलीहून ब्रिटनपर्यंत पोहचला आहे. 39 वर्षीय आरफॉन समर्स यांनी हा मासा पकडला आहे.
या माशामध्ये विषानं भरलेले 13 काटे असतात. हे मासे जिथे जातात तिथं इतर समुद्री जीवांच्या प्रजातींचं नुकसान करतात. सामान्यतः दक्षिण प्रशांत आणि हिंदी महासागरात आढळणारे हे मासे ग्लोबल वॉर्मिंगमुळे भूमध्य समुद्रात आढळू लागले आहेत.
या माशाकडं विषारी डंख आहेत जे माणसाला चावल्यानंतर खूप वेदनादायक ठरतात. लायनफिशच्या डंकांमुळे वेदना आणि श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या सुरू होतात. या माशाचा डंक इतका विषारी आहे की तो माणसाचा जीवही घेऊ शकतो.