Home /News /videsh /

गेंड्याचा पाठलाग करत होती कार, संतापलेल्या जनावरानं काय केलं? पाहा VIDEO

गेंड्याचा पाठलाग करत होती कार, संतापलेल्या जनावरानं काय केलं? पाहा VIDEO

संतापलेल्या गेंड्याचा (Rhinoceros) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे.

    मुंबई, 11 एप्रिल:  जंगली जनावरांचा (Wild animal) पाठलाग करणं किंवा त्यांना त्रास देणं हे संकटाला निमंत्रण देण्यासारखं आहे. कारण या जनावरांना त्यांचा पाठलाग केलेलं अजिबात आवडत नाही. कुणी त्यांचा पाठलाग करत असेल तर अनेकदा ही जनावर हिंस्त्र (violent) होतात. संतापलेल्या गेंड्याचा (Rhinoceros) एक व्हिडीओ  सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. हा व्हिडीओ @almodeeer1975 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तो अगदी कमी कालावधीत व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक गेंडा जंगलातून चालताना दिसत आहे. त्या गेंड्याच्या मागे एक कार जात आहे. कार मागे येत असल्याचं पाहून गेंडा थोडा विचलित झाला आहे. कार ड्रायव्हरला याचं भान नाही.  गेंडा सावकाश चालत असल्याचं पाहून तो ड्रायव्हरही त्याच्या मागे अगदी सावकाश कार चालवत आहे. कार ड्रायव्हरची ही कृती गेंड्याला आवडत नाही. तो अचानक थांबतो आणि मागे वळतो. ड्रायव्हरला काही समजण्याच्या आतच गेंडा त्याच्या डोक्यानं कारला धडका देऊ लागतो. ड्रायव्हरला त्याच्या बचावाची कोणतीही संधी तो देत नाही. संतापलेला गेंडा वेगान कारला ढकलत दुसऱ्या बाजूला घेऊन जातो. त्यानंतर गेंडा कारला जोरदार धक्का देतो. त्यामुळे ती कार अक्षरश: उलटी होते. मग काय, गेंडा एखाद्या फुटबॉलसारखं कारला पायानं लाथाडू लागतो. ( VIDEO - जंगलात असं काही घडलं की जंगलाच्या राजाचीही झोप उडाली; पाहताच भरली धडकी ) कार ड्रायव्हरला इतका त्रास देऊनही गेंडा शांत होत नाही. तो सतत कारला धडका देतो. अनेकदा कारला उचलून खाली टाकतो. कारचं संपूर्ण नुकसान झाल्यानंतर तो कारच्या समोर उभा राहून त्याकडं पाहू लागतो. कारमध्ये बसलेल्या व्यक्तींबाबत काय झालं आहे? याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Shocking viral video, Wild animal, Wild life

    पुढील बातम्या