Home /News /lifestyle /

सणासुदीत बिनधास्त खा! Cholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त फॉलो करा या टीप्स

सणासुदीत बिनधास्त खा! Cholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त फॉलो करा या टीप्स

आहार तज्ज्ञांच्या मते अनहेल्दी आहार हा मानवी शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवण्सात सर्वात प्रमुख कारण आहे.

    मुंबई, 01 सप्टेंबर : अतिप्रमाणात कोलेस्ट्रॉल (Cholesterol) हा हृदयविकारासाठी कारणीभूत ठरत असतो. कोलेस्ट्रॉलचे अधिक प्रमाण हे तळलेल्या पदार्थांमध्ये असते. जो आरोग्यासाठी घातक ठरतो. आता तर सणवार सुरू झाले आहेत. त्यामुळे तळलेल्या पदार्थांच्या आहाराचं प्रमाण वाढतं. ज्यात अतिरिक्त साखर आणि तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे सुद्धा आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. आहार तज्ज्ञांच्या मते अनहेल्दी आहार हा मानवी शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवण्सात सर्वात प्रमुख कारण आहे. त्यामुळे आगामी सणवारांच्या काळात कोलेस्ट्रॉलला मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टी टाळाव्या लागतील तर काहींचे नियमित सेवन करावं लागेल. धान्यांचा जास्तीत जास्त समावेश करा धान्यांचं अधिकाधिक सेवन केल्याने ब्लडप्रेशर कंट्रोल करण्यात मदत होते. रिफाइंड प्रोडक्ट्स खाणं शक्यतो टाळावं. फलाहार फळं आणि फळभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर हे कोलेस्ट्रॉलला कमी करण्यात मदत करते. त्याचबरोबर फायबर रक्तपुरवठा सुरळीत करतो. त्यामुळे फलाहार हा आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीरच आहे. हे वाचा - Saddest Bacon Sandwich : ऐकावं ते नवलच! हे आहे जगातलं सर्वांत दुःखी सँडविच नट्स सुकामेवा हा अनसॅचुरेटेड फॅटसाठी महत्त्वाचा आहे. ते कोलेस्ट्रॉलला मेंटेन करण्यात मदत करते. त्यामुळे धमण्यांमधील रक्तपुरवठा सुरळीत होतो. याबरोबरच प्रोटीन, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि इतर पोषकद्रव्ये मिळतात. जे शरीरासाठी उपयोगी आहे. हेल्दी तेल ऑलिव्ह ऑईल  आणि मोहरीचे तेल प्रचंड फायदेशीर आहे. ज्यात अनसॅचुरेटेड फॅट असतं. जो कोलेस्ट्रॉलला कमी करतो. नारळ तेलापासून तयार झालेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. कारण त्यात फॅट अधिक प्रमाणात असतं. हे वाचा - चष्म्यापासून लवकर मुक्तता हवी; आहारात समाविष्ट करा फक्त हे 5 पदार्थ कोलेस्ट्रॉलला मेंटेन करण्यासाठी अनारोग्य पद्धतीने असलेल्या आहाराला आळा घालणे आवश्यक आहे. रिफाईंड तेल, हायड्रोजेनेटेड तेल किंवा पनीरचे सेवन कमी करून माशांचा आहारात समावेश करायला हवा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या