मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Healthy Life: हा टेस्टी ब्रेकफास्ट आहे अनुष्का शर्माच्या सडपातळ आरोग्याचे गुपित

Healthy Life: हा टेस्टी ब्रेकफास्ट आहे अनुष्का शर्माच्या सडपातळ आरोग्याचे गुपित

आई झाल्यानंतरही अनुष्का शर्माने काही दिवसांतच फॉर्ममध्ये येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. अनुष्का सडपातळ कंबर आणि उत्तम फिटनेससाठी नेमकं काय करते, हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. यामागचे एक महत्त्वाचे रहस्य खुद्द अनुष्कानेच उघड केलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे (Bollywood actress Anushka Sharma) सौंदर्य आणि तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होते. आई झाल्यानंतरही अनुष्का शर्माने काही दिवसांतच फॉर्ममध्ये येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. अनुष्का सडपातळ कंबर आणि उत्तम फिटनेससाठी नेमकं काय करते, हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. यामागचे एक महत्त्वाचे रहस्य खुद्द अनुष्कानेच उघड केलं आहे आणि ते म्हणजे तिचा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता.

या गोष्टी नाश्त्यात खाल्ल्या जातात

झी न्यजूने दिलेल्या बातमीनुसार अलीकडेच अनुष्का शर्माने (Anushka Sharma) इंस्टाग्रामवर तिच्या नाश्त्याचा फोटो शेअर केला आहे, तो एका काचेच्या बरणीत होता. हा नाश्ता दिसायला जितका चविष्ट वाटत आहे, तितकाच खायलाही आरोग्यदायी आहे. या बरणीमध्ये फळे, अक्रोड, दूध आणि चिया बियांनी बनवलेला आरोग्यदायी नाश्ता असतो, जो स्मूदीसारखा असतो. हा नाश्ता बनवायला कमी वेळ लागेल आणि तयार करणेही सोपे काम आहे. यामध्ये असलेल्या उच्च प्रथिनांमुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि तुमचे वजनही व्यवस्थित राहते. यासोबतच शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.

हे वाचा - Office Work Tips: आता ऑफिसमधील टेन्शन ऑफिसमध्येच ठेवा; WFH दरम्यान अशा पद्धतीनं करा Mood Fresh

हा नाश्ता बनवणे खूप सोपे आहे

रोल केलेले ओट्स एका मेसन जारमध्ये 2/3 उंचीपर्यंत ठेवा आणि नंतर त्यात 2 चमचे चिया बिया घाला. आता दूध घाला आणि 2 चमचे मध आणि तुमच्या आवडीचा सुका मेवा मिक्स करा. त्यात ताजी फळे टाका आणि मिक्स करून खा. जर तुम्हाला मध खाण्याची इच्छा नसेल तर तुम्ही त्यात एक चमचा व्हॅनिला अर्क देखील टाकू शकता. हा भरपूर फायबरचा नाश्ता केल्यानंतर, तुम्हाला तासन्तास दुसरे काहीही खाण्याची गरज भासणार नाही आणि तुम्ही अस्वास्थ्यकर पदार्थ खाण्यापासून वाचाल.

First published:
top videos

    Tags: Anushka sharma, Fitness