मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लग्नाशिवाय एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना हे अधिकार माहितीच हवेत; कधीही येणार नाही अडचण

लग्नाशिवाय एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना हे अधिकार माहितीच हवेत; कधीही येणार नाही अडचण

भारतात असे अनेक कायदे आहेत जे अविवाहित जोडप्यांसाठी आहेत.

भारतात असे अनेक कायदे आहेत जे अविवाहित जोडप्यांसाठी आहेत.

भारतात असे अनेक कायदे आहेत जे अविवाहित जोडप्यांसाठी आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 नोव्हेंबर : भारतीय संस्कृतीमध्ये 'लग्न' ही अतिशय महत्त्वाची संस्था मानली जाते. लग्न न करता एकत्र राहणाऱ्या म्हणजेच ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्याकडे आजही समाजात फार चांगल्या नजरनं बघितलं जात नाही. गाव-खेड्यांमध्ये तर याबाबत उघडपणे चर्चाही रंगतात. मात्र, शहरांमध्ये हळूहळू आता लिव्ह-इन रिलेशनशीपला समाजमान्यता मिळत आहे. आपल्या देशातही अविवाहित असून एकत्र राहणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी सरकारनं काही कायदे केले आहेत. पण, बहुतेकांना हे कायदे आणि अधिकारांबद्दल माहिती नाही. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आणि राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांना या कायद्यांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ‘हर जिंदगी’ डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

1) घर घेताना एकत्र अ‍ॅग्रीमेंट असणं आवश्यक

तुम्ही आणि तुमचा लिव्ह-इन पार्टनर जर अपार्टमेंट भाड्यानं घेणार असाल तर, त्याचं अ‍ॅग्रीमेंट एकत्र म्हणजे दोघांच्या नावे असणं आवश्यक आहे. घर विकत घेतानाही घराच्या खरेदीची कागदपत्रं दोघांच्या नावे असावीत. जर घराची कागदपत्रं दोघांच्या नावे असतील तर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे. कुणीही तुम्हाला वेगळं राहण्यास भाग पाडू शकत नाही.

2) सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसण्याचा अधिकार

तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत फिरण्याचा किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसलेले असाल तर पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाहीत. मात्र, जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदारानं सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केलं तर आयपीसीतील कलम 294 नुसार, तुम्हाला तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

वाचा - #कायद्याचंबोला : ...तर विधीवत लग्न करुनही महिलेला मिळणार नाही पत्नीचे अधिकार

3) हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा अधिकार

अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यापासून रोखणारा कोणताही कायदा देशात अस्तित्वात नाही. कोणत्याही अविवाहित जोडप्याला एकाच खोलीत राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे. फक्त यासाठी त्यांच्याकडे वैध ओळखपत्र असणं आवश्यक आहे. वैध आयडी प्रूफ दिल्यानंतर कोणताही हॉटेल ऑपरेटर रूम बुक करण्यास नकार देऊ शकत नाही. पोलिसांनी जर हॉटेलवर छापा टाकला तर अविवाहित जोडपं ओळखपत्रं दाखवून पोलिसांना त्यांच्या नात्याबद्दल सांगू शकतं.

3) इच्छा होईल तेव्हा लग्न करू शकतात

अनेकदा जोडप्याच्या रिलेशनशीपला कुटुंब मान्यता देत नाही. त्यांना लग्न करण्याची परवानगी देत नाही. मात्र, कायद्यानुसार वयाची अट पूर्ण करणारं कोणतंही जोडपं लग्न करू शकतं. भारतीय संविधानातील कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकाला जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कलम 21 नुसार, तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रौढ असल्यास, तुम्ही एकत्र राहू शकता आणि तुम्हाला मनाला वाटेल तेंव्हा लग्न करण्याचाही अधिकार आहे.

वरील कायदे आणि अधिकारांची मदत घेऊन तुम्ही तुमच्या जोडीदाराशी लग्न न करताही एकत्र राहू शकता.

First published:

Tags: Law, Relationship