जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आता कायद्यानुसारच Condom वापरावा लागणार; सेक्सदरम्यान एक छोटीशी चूक केली तरी शिक्षा

आता कायद्यानुसारच Condom वापरावा लागणार; सेक्सदरम्यान एक छोटीशी चूक केली तरी शिक्षा

बेलसर ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचं  वाटप केलं आहे.

बेलसर ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचं वाटप केलं आहे.

कंडोम वापराबाबत आता कायदा करण्यात आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 08 सप्टेंबर : सेक्स (Sexual Relationship) ही तशी वैयक्तिक गोष्ट (Personal Life). फक्त दोन व्यक्तींमधील खासगी क्षण (Sexual life). यादम्यान कंडोम (Condom) वापरायचा की नाही हे ठरवण्याचा निर्णय त्या दोघांचा. पण आता कंडोम वापर कायद्याअंतर्गत आला आहे (Law for condom use). त्यामुळे आता कायद्यानुसराच कंडोमचा वापर (Condom use) करावा लागणार आहे. अमेरिकेच्या (United States ) कॅलिफोर्नियात (California) कंडोमला कायद्याच्या चौकटीत आणण्यात आलं आहे. कंडोम वापराबाबत काही नियम (Condom Use Rules). तयार करण्यात आले आहेत. या नियमानुसार कंडोम वापरायचा आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास  शिक्षा ठोठावली जाणार आहे (Weird Rule). कायद्यानुसार सेक्स करताना पार्टनरच्या परवानगीशिवाय कंडोम काढणं हा गुन्हा आहे (Removing Condom without Permission). असं काही झाल्यास पीडितेला तक्रार करता येईल. अशा प्रकरणात आरोपीविरोधात मानसिक आणि शारीरिक हानी पोहोचवल्याविरोधात गुन्हा दाखल होईल. मग कायदेशीर कारवाई केली जाईल. हे वाचा -  हे काय आहे? जिथं पाहावं तिथं फक्त Condom; चक्क हायवेवर कंडोमचा खच अमेरिकन वृत्तपत्र इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार असा कायदा करणारा कॅलिफोर्निया अमेरिकेतील पहिलं राज्य असेल. पण याआधी जगभरात कुठेही असा कायदा असल्याची माहिती नाही. हे विधेयक कॅलिफोर्नियातील एसेम्बलीमध्ये सादर करण्यात आलं होतं. त्यावेळी सर्वांनी संमती दिली नव्हती. आता हे या विधेयकाला कायद्याचं रूप देण्याची तयारी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पार्टनरला न सांगता किंवा लपूनछपून कंडोम हटवण्याचे अनेक नुकसान आहेत. हा संबंधांमध्ये विश्वासघात आहे. तसंच पीडितेच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीसुद्धा हे ठिक नाही. यामुळे लैंगिक आजार, प्रेग्नन्सी आणि मानसिक आघात यांचा  धोका आहे. त्यामुळेच असा विचित्र कायदा बनवण्याची गरज पडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात