Home /News /national /

हे काय आहे? जिथं पाहावं तिथं फक्त Condoms; चक्क हायवेवर कंडोमचा खच

हे काय आहे? जिथं पाहावं तिथं फक्त Condoms; चक्क हायवेवर कंडोमचा खच

हायवेवर कित्येक किलोमीटपर्यंत कंडोम पसरलेले दिसले.

    बंगळुरू, 08 सप्टेंबर : हायवे म्हटलं की त्यावर भरधाव वेगाने पळणाऱ्या गाड्या किंवा ट्राफिक आतापर्यंत आपण पाहिलं आहे. पण याच हायवेवर असं काही दिसलं की सर्वजण शॉक झाले आहेत. नॅशनल हायवेवर (National Highway) चक्क कंडोमच कंडोम दिसून आले आहेत (Condoms on highway) . रस्त्यात जिथं पाहावं तिथं कंडोमच कंडोम दिसले. राष्ट्रीय महामार्गावर कितीतरी किलोमीटरपर्यंत हे कंडोम पसरलेत (Kilometers of condoms). रस्त्याच्या किनाऱ्यावर कंडोम पडले होते. कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातील हे धक्कादायक दृश्य. तुमकूर हे मोठ्या औद्यागिक शहरांपैकी एक आहे. हे वाचा - इथं प्रत्येक पुरुषाच्या 2 बायका! दुसऱ्या लग्नाला नकार दिल्यास मिळते भयानक शिक्षा तुमकूरजवळील नॅशनल हायवे 48 वर काथसांद्रा आणि बटवाडी मार्गावर कंडोम पसरलेले आहेत. हा हायवे दिल्लीपासून तामिळनाडूची राजधानी चेन्नईपर्यंत जातो. सात राज्यांमधून हा हायवे आहे. यामध्ये दिल्ली, हरयाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिलनाडूचा समावेश आहे. एकूण 2807 किलोमीटरचा हा हायवे आहे. हे वाचा - जगातला सर्वात महागडा Condom; किंमत वाचूनच येईल चक्कर हायववेर इतके कंडोम पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. इतके कंडोम हायवेवर कसे काय, याचाच आश्चर्य सर्वांना वाटत आहे. कुणीतरी दुसऱ्या ठिकाणांहून कंडोम आणून इथं पसरवले असतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.किंवा कंडोम कंपनीच्या कारमधून हे कंडोम पडले असावेत, असाही अंदाज बांधला जातो आहे. पण याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Karnataka, Lifestyle, Shocking news

    पुढील बातम्या