नवी दिल्ली, 23 जुलै : ऑफिसमध्ये खरं तर पूर्ण वेळ फक्त काम आणि काम करणं अपेक्षित असतं. कामाच्या मध्ये विरंगुळा म्हणून बरेच जण इतर गोष्टीही करतात. यात मग चहाचे छोटे-छोटे ब्रेक घेणं असो किंवा मग काम करत करत गाणी ऐकणं असो. ताण दूर करण्यासाठी प्रत्येकाची वेगळी अशी पद्धत असते; मात्र काहीही झालं तरी ऑफिसमध्ये पॉर्न (Watching pornography in office) तर कोणी पाहत नसेलच, असा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण भरपूर जण चक्क ऑफिसमध्येही पॉर्न पाहतात, असं कित्येक रिसर्चमधून (Research on people who watch porn at office) समोर आलं आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
डिजिटल लाइफस्टाइल मॅगझिन असलेल्या ‘शुगरकुकी’ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या मॅगझिनने केलेल्या रिसर्चमध्ये जगभरातल्या विविध कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. यापैकी 60 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी (60 percent people agreed that they watch porn in office) ऑफिसमध्ये काम करताना आपण पॉर्न पाहिल्याचं कबूल केलं. 2020 साली कास्पर्सकी या इंटरनेट सिक्युरिटी कंपनीने केलेल्या एका सर्व्हेमध्येही वर्क फ्रॉम होम करणाऱ्या अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी आपण ऑफिसच्या वेळेत लॅपटॉप किंवा मोबाइलवर पॉर्न पाहिल्याचं मान्य केलं होतं.
हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा
संध्याकाळी लॉगआउट करताना पाहतात पॉर्न
जगातली सर्वांत मोठी पॉर्न साइट समजल्या जाणाऱ्या पॉर्नहबनेही 2021 मध्ये एक संशोधन केलं होतं. यामध्ये जगभरातले कित्येक कर्मचारी ऑफिसच्या वेळेत पॉर्न (People watch porn in office hours) पाहत असल्याचं स्पष्ट झालं होतं. रात्री दहा ते एक या वेळेत पॉर्न सर्वाधिक पाहिलं जात असल्याचं आकडेवारीनुसार स्पष्ट करण्यात आलं होतं. संध्याकाळी चार ते पाच या वेळेत, म्हणजेच ऑफिसची वेळ संपत आल्यानंतरही पॉर्न पाहण्याच्या प्रमाणात भरपूर वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे.
हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर
ऑफिसमध्ये का पाहतात पॉर्न
सायकॉलॉजिकल रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे, की अनेक कामाच्या वेळी कंटाळा आल्यामुळे पॉर्न (Why do people watch porn) पाहतात. तसंच, कित्येक जण एक नवीन अनुभव म्हणूनही ऑफिसमध्ये पॉर्न पाहतात. या गोष्टींमुळे त्यांना कामाच्या ठिकाणी पॉर्न पाहण्याची प्रेरणा मिळते, असं यूकेमधल्या बर्मिंगहम सिटी युनिव्हर्सिटीतले हेल्थ सायकोलॉजीचे प्राध्यापक क्रेग जॅक्सन यांनी बीबीसीला सांगितलं.
क्रेग यांनी सांगितलं, की कित्येक कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी (Why people watch porn in office) असं वाटतं, की आपल्याला टाळलं जात आहे. लोक आपल्यापासून दूर जात आहेत. अशा नकारात्मक स्थितीला तोंड देण्यासाठीदेखील त्या व्यक्ती पॉर्नचा आधार घेतात. तसंच, ऑफिसमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये ज्यांना लहान लहान गोष्टींवर ज्यांना भरपूर राग येतो, अशा व्यक्तींचं प्रमाण अधिक असल्याचंही क्रेग यांनी स्पष्ट केलं. या व्यक्ती ताण कमी करण्यासाठी आणि नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी असं करतात, अशी माहिती क्रेग यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Porn sites, Porn video