मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Aquarius Personality: दूरदर्शी आणि चांगला नेता बनते कुंभ राशीची व्यक्ती; वाचा त्यांची ही 10 वैशिष्ट्ये

Aquarius Personality: दूरदर्शी आणि चांगला नेता बनते कुंभ राशीची व्यक्ती; वाचा त्यांची ही 10 वैशिष्ट्ये

कुंभ- कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योगाची निर्मिती शुभ राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील. यावेळी तुम्ही कर्जापासून मुक्त होऊ शकता. बोलण्यात फक्त संयम ठेवा. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कुंभ- कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योगाची निर्मिती शुभ राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील. यावेळी तुम्ही कर्जापासून मुक्त होऊ शकता. बोलण्यात फक्त संयम ठेवा. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Aquarius Personality: या राशीचे लोक कायदे आणि नियमांची खूप काळजी घेतात. या राशीचा व्यक्ती एक दूरदर्शी आणि चांगला नेता बनू शकतो. या राशीच्या लोकांची दृष्टी शुभ मानली जाते. कुंभ राशीच्या लोकांची इतर कोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून (Aquarius Personality) घेऊया.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : आज आपण कुंभ राशीबद्दल माहिती जाणून घेऊयात. कुंभ ही 12 राशींपैकी 11 वी रास आहे. या राशीचे प्रतीक म्हणजे खांद्यावर पाण्यानं भरलेलं भांडं (कुंभ) घेऊन जाणारा माणूस. कुंभ राशीचा (Kumbha) शासक ग्रह शनी आहे. शनीमुळे या राशीचे लोक दृढनिश्चयी असतात. या राशीचे लोक कायदे आणि नियमांची खूप काळजी घेतात. या राशीची व्यक्ती एक दूरदर्शी आणि चांगला नेता बनू शकते. या राशीच्या लोकांची दृष्टी शुभ मानली जाते. कुंभ राशीच्या लोकांची इतर कोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून (Aquarius Personality) घेऊया.

कुंभ राशीची प्रमुख वैशिष्ट्ये

1. कुंभ राशीचे लोक स्थिर आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात. ते थोडे चिंतनशील असतात. कधीकधी ते स्वत:वर मर्यादा घालून घेतात.

2. या राशीचे लोक लाजाळू आणि संवेदनशील स्वभावाचे असतात. इतरांच्या भावनांची काळजी घेतात.

3. एकदा त्यांनी एक ध्येय ठरवले तर कोणत्याही परिस्थितीत ते साध्य करतात. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यायला ते मागे हटत नाहीत.

4. ते कोणतेही काम किंवा कला पटकन शिकतात. त्यांना दिखाऊपणा करणं अजिबात आवडत नाही. त्यांना मळलेल्या वाटेवरून जायला आवडत नाही. तुम्हाला असे लोक नेहमी चौकटीबाहेर जाऊन काम करताना पहायला मिळतील. मात्र, त्यांना इतरांच्या कामात ढवळाढवळ करणं आवडत नाही.

5. हे लोक इतरांशी दयाळू वागतात. समाजाच्या कल्याणासाठी हे लोक सदैव तत्पर असतात.

6. कुंभ राशीच्या लोकांसाठी पैशाची कमतरता नसते. हे धनवान असतात. ते धैर्यवान आहेत आणि त्यांच्या सामर्थ्यानं पैशांचा वापर करणारे असतात.

7. या राशीच्या लोकांना स्वातंत्र्य आवडतं. ते आधुनिक विचारांचे असतात आणि त्यांना विज्ञान किंवा तंत्रज्ञानामध्ये रस आहे.

हे वाचा - Winter skin care: थंडीमध्ये त्वचेसाठी जबरदस्त आहे हे होममेड सीरम; अनेक महागडी प्रॉडक्ट पडतील फेल

8. कुंभ राशीच्या लोकांना त्यांचं खासगीपण (प्रायव्हसी) राखणं खूप प्रिय असतं. यामध्ये इतरांचा हस्तक्षेप त्यांना नको असतो. ते तासनतास एकाग्रतेनं काम करू शकतात.

9. या राशीचे लोक कुशल शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा कायद्याचे तज्ज्ञ बनू शकतात. लोह किंवा पेट्रोलियम पदार्थांच्या व्यवसायातही ते यशस्वी होतात.

हे वाचा - Clove Milk Benefits: लवंग-दूध पिण्याचे हिवाळ्यात आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

10. कुंभ राशीच्या लोकांना खोटी प्रशंसा आवडत नाही. ते लगेच कोणाबद्दलही विचार बदलत नाहीत. ते चांगले श्रोते असतात. त्यांना फक्त वास्तववादी जीवन आवडते. काहीवेळा कुंभ राशीचे लोकही संन्यासाकडेही वळू शकतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark