जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Elbow current | हाताच्या कोपऱ्याला लागलं तर करंट का बसतो? उत्तर मिळालं

Elbow current | हाताच्या कोपऱ्याला लागलं तर करंट का बसतो? उत्तर मिळालं

Elbow current | हाताच्या कोपऱ्याला लागलं तर करंट का बसतो? उत्तर मिळालं

तुमच्यासोबत असे अनेकवेळा घडले असेल की जेव्हा तुमच्या कोपऱ्याला काही लागलं किंवा कोपरा कशावर आदळला तर करंट लागल्यासारखं झालं असेल. पण, असं का होतं आणि हा धक्का का बसतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 21 फेब्रुवारी : आपलं शरीर संवेदनशील असतं. शरीराच्या कोणत्याही भागावर काही लागलं किंवा जखम (injury) झाली तर वेदना जाणवतात; पण हाताच्या कोपराला (elbow) काही लागलं किंवा तो भिंतीवर आदळला तर अचानक करंट जाणवतो आणि झटका बसतो. असं का होतं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? विचार केला असेल आणि उत्तर मिळालं नसेल तर ही बातमी वाचाच. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, कोपरातल्या या हाडांना फनी बोन्स (Funny bone) म्हणतात. जेव्हा हे हाड कोणत्याही कठीण वस्तूवर आपटतं, तेव्हा करंट लागतो. याचं कारण म्हणजे या भागातून जाणारी अल्नर नर्व्ह (Ulnar nerve). आता या हाडांना फनी बोन्स का म्हणतात आणि फक्त याच हाडांमधून करंटचा धक्का का जाणवतो, हे जाणून घेऊ या. खांदा आणि कोपरा यांच्यामधल्या हाडाला ह्युमरस (Humours) म्हणतात. ह्युमर या शब्दावरूनच त्याचं नाव फनी बोन्स असं पडलं, असं बीबीसीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दुसऱ्या एका रिपोर्टनुसार, या हाडावर काहीही आपटल्यास करंट बसतो. परंतु तसं खरंच होत नाही. ते एका विनोदासारखं आहे, म्हणून त्याला फनी बोन असं नाव देण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की शरीरात एक अल्नर नावाची नर्व्ह असते. ही नर्व्ह मणक्यातून निघते आणि खांद्यांमधून बोटापर्यंत पोहोचते. ही नर्व्ह कोपराच्या हाडाचं संरक्षण करण्याचं काम करतं. त्यामुळे या नर्व्हवर जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट आपटते किंवा तिथे कोणती कडक वस्तू लागते तेव्हा त्या व्यक्तीला त्याचा परिणाम हाडावर झाल्याचं जाणवतं; मात्र तसं नसतं, त्यावेळी त्याचा परिणाम फक्त अल्नर नर्व्हवर झालेला असतो. असं झाल्यानंतर न्यूरॉन्स मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतात आणि जेव्हा रिअ‍ॅक्शन (reaction) येते तेव्हा करंट लागल्यासारखा झटका बसतो. ‘जगाला आणखी एका साथीच्या रोगाचा सामना करावा लागेल’ बिल गेट्स यांचा इशारा नर्व्हचा कोपरातून जाणारा भाग त्वचा आणि चरबीने झाकलेला असतो. त्यामुळे अशा रीतीने जेव्हा कोपर कशाला तरी आपटतं, तेव्हा या नर्व्हला धक्का बसतो. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, या कोपराला लागलं की अल्नर नर्व्हला लागल्याचं समजायचं. थेट या नर्व्हवर पडणारा दबाव हा खूप तीव्र असतो आणि तो करंट, गुदगुल्या किंवा वेदना या स्वरूपात जाणवतो. अशा रितीने कोपरामध्ये करंट (current) लागल्यासारख्या वेदना जाणवण्यासाठी फनी बोन्स (funny bones) नाही तर अल्नर नर्व्ह जबाबदार आहे. त्यामुळे तुमचा कोपरा कधी कोणत्याही वस्तूवर आपटला किंवा कोपरावर लागल्याने करंटसारखा झटका बसला, तर ते अल्नर नर्व्हमुळे झालंय, असं समजायचं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात