आपण सतत सांगतो आणि ऐकतो सुद्धा की सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा असतो. सायन्स फिक्शन लिहिणारे रॉबर्ट ए हेनलेन यांनी सांगितलं होते की, 'जगाचा अंत होत असेल तरी सुद्धा त्यामध्ये नाश्ता केल्याशिवाय सहभागी होऊ नका.' रॉबर्ट एकदम बरोबर बोलले होते. सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर ऊर्जा देतो. म्हणजे जे काम दुपारचं आणि रात्रीचं जेवण करू शकत नाही ते सकाळचा नाश्ता करतो.
नाश्ता म्हणजे जेवण जे रात्रीच्या 8 तासांच्या झोपेनंतर केले जाते. या शब्दाचा जन्म 'disner' या इंग्रजी शब्दातून झाला आहे. ज्याचा अर्थ 'ब्रेक अ फास्ट' म्हणजे उपवास सोडणं. 15 व्या शतकात हा शब्द इंग्रजी भाषेत समाविष्ट झाला.
फूड इनसाइटच्या एका सर्वेक्षणानुसार, बऱ्याच लोकांना नाश्ता करण्याचे फायदे माहित नाहीत. ते सकाळी नाश्ता करत नाहीत. त्यानंतर एकदाच पोटभर जेवणच करून घेतात. पण नाश्ता करण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते.
टोटल हेल्थ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या जेवणानंतर जवळपास 9 ते 10 तासांच्या आत नाश्ता करून घेतला पाहिजे. आहार तज्ज्ञांच्या मते, 'सकाळी उठल्यानंतर अर्धा तासांच्या आत पोटात काहीना काही पौष्टीक पदार्थ गेला पाहिजे. त्यानंतर दोन तासांच्या आतमध्ये पूर्ण नाश्ता करून घेतला पाहिजे.
अमेरिकेतून संपूर्ण जगाला सल्ला देणाऱ्या वेबसाइटची संस्थापक किम लार्सन यांनी सांगितल्याप्रमाणे, 'सकाळी उठल्यानंतर जितक्या लवकर तुम्ही नाश्ता कराल तितका तुमचा मेटाबोलिझम चांगला होईल. आपण खाल्लेल्या अन्नाचं पचनसुद्धा व्यवस्थित होईल.
सकाळी 10 वाजल्यानंतर नाश्ता करणं योग्य नाही. हा ब्रंच आहे म्हणजे नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचा मिश्रित प्रकार. आपल्या नाश्त्यामध्ये प्रथिनं आणि फळांचा समावेश असला पाहिजे.
सकाळचा नाश्ता न केल्यामुळे आपल्या 'हंगर हॉर्मोन्स'मध्ये (Hunger Hormones) गोंधळ होतो. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच नाश्ता करणं खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे आपण एकाच वेळी आवश्यकतेपेक्षा जास्त खातो. त्यामुळे पूर्ण दिवसाचा डाएट प्रभावित होतो.
साधारणत: घरामध्ये आपली सकाळची वेळ खूप गडबडीची असते. त्यामुळे सकाळी नाश्ता करणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत नाश्ताची योग्य योजना आखली जाऊ शकते. म्हणजेच, असे प्रथिनेयुक्त पदार्थ ठेवा जे आपल्याला तयार करावे लागणार नाहीत.