Home /News /lifestyle /

Winter Health: मकर संक्रातीदिवशीच नव्हे तर संपूर्ण हिवाळ्यात खा तिळगुळाच्या वड्या; तब्येत राहील ठणठणीत

Winter Health: मकर संक्रातीदिवशीच नव्हे तर संपूर्ण हिवाळ्यात खा तिळगुळाच्या वड्या; तब्येत राहील ठणठणीत

संक्रांतीव्यतिरिक्त हिवाळ्यात एरवीही तिळगुळाच्या वड्या खाणं अनेकांना आवडतं. पण तिळगुळ फक्त चवीसाठी खाण्याचा पदार्थ नसून तो आरोग्यासाठीही अनेक प्रकारे (Health benefits of sesame and jaggery) फायदेशीर आहे.

    मुंबई, 14 जानेवारी : हिवाळ्यात तिळगुळाच्या वड्या खाण्याची मजा काही और असते. हिवाळ्यातच येणाऱ्या संक्रांतीला देशातील विविध भागात तिळगुळाच्या वड्या बनवण्याची परंपरा आहे. खासकरून, महाराष्ट्रात हा सण आणि तिळगुळ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. संक्रांतीला घरच्या घरी खाण्यासाठी आणि संबंधित लोकांना वाटण्यासाठी तिळगुळाच्या वड्या बनवल्या जातात. शिवाय, संक्रांतीव्यतिरिक्त हिवाळ्यात एरवीही तिळगुळाच्या वड्या खाणं अनेकांना आवडतं. पण तिळगुळ फक्त चवीसाठी खाण्याचा पदार्थ नसून तो आरोग्यासाठीही अनेक प्रकारे (Health benefits of sesame and jaggery) फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया पारंपरिक तिळगुळाचे आरोग्याला होणारे फायदे - हाडं मजबूत होतात तिळगुळ खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात. या पदार्थात मुख्यतः तीळ आणि गूळ वापरले जातात. काही जण यामध्ये शेंगदाणेही मिसळतात. त्यामुळं त्यामध्ये भरपूर कॅल्शियम आढळतं. याच्यामुळं हाडं मजबूत होतात. इतकंच नाही तर, तिळगुळ आर्थराईटिसची समस्या दूर करण्यासही मदत करतो. रक्तदाब नियंत्रित राहतो तिळगुळ खाल्ल्यानं रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यातील तिळामध्ये असलेल्या सिसामोलिन मुबलक प्रमाणात असतं. हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतं. ऊर्जा मिळते तिळगुळात तीळ आणि गूळ हे ताकद देणारे पदार्थ असल्यानं यातून ऊर्जा मिळते. यासोबतच अनेक प्रकारच्या तिळगुळांमध्ये सुका मेवाही वापरला जातो. याच्यामुळं अशक्तपणा दूर करून शरीराला ऊर्जा मिळते. चांगलं पचन तिळगुळ खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते. तिळगुळामध्ये भरपूर फायबर असतं. याच्यामुळं पचन सुधारण्यास मदत होते. यासोबतच बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्याही दूर होतात. अॅनिमियाची समस्या दूर होते तिळगुळात लोह मुबलक प्रमाणात आढळतं. त्यामुळं नेहमी तिळगुळ खाल्ल्यानं अॅनिमियाची समस्या दूर होते. थकवा आणि अशक्तपणापासूनही आराम मिळतो. हे वाचा - Mistake during Workout: व्यायाम करताना 80 टक्के लोक ही चूक करतात; तुमची पद्धत बरोबर आहे ना? शरीराला उष्मांक मिळतात तिळगुळ खाल्ल्यानं शरीराला उष्मांकही मिळतात. कारण तीळ आणि गूळ या दोन्हींचा प्रभाव उष्ण असतो. त्यामुळं हिवाळ्यात याचं सेवन केलं जातं. हे वाचा - या 5 पद्धतीनं कोरफडीचा आहारात करा समावेश; आश्चर्यकारक कमी होऊ लागेल वजन त्वचा चमकदार बनते तिळगुळ खाल्ल्यानं त्वचा चमकदार बनते. तिळगुळामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट, झिंक आणि सेलेनियमसारखे त्वचेला तरुण बनवण्यास मदत करतात. यामुळं त्वचेवरील बारीक रेषा, सुरकुत्यादेखील कमी होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Makar Sankranti, Winter, Winter session

    पुढील बातम्या