मुंबई, 15 मार्च: आपल्या देशात पान आवडीनं खाल्लं जातं. लग्नासह अनेक समारंभ, शुभ कार्यावेळी जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आहे. बनारसी पान हे तर विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील शेतकरी पानांचे उत्पादन घेतात. पानाचा वापर जसा खाण्यासाठी केला जातो तसाच पूजा-विधीसाठीही पानांचा वापर होतो. जेवणानंतर पान खाणं आरोग्यासाठी (Betel for Health) हितावह मानलं जातं. पानामुळे बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास कमी होऊन पचनक्रिया सुधारते. पुरुषांमधली लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी पान उपयुक्त ठरते. तसेच पानामुळे शरीराच्या जखमा (Wounds) भरुन येण्यास मदत होते. आरोग्यविषयक अनेक समस्या दूर करण्यासाठी पानाचं सेवन फायदेशीर ठरतं. देशात पानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेक ठिकाणी पान खाणं ही एक प्रथा मानली जाते. जेवणानंतर पान खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. आजकाल बद्धकोष्ठता ही सर्वसामान्य समस्या आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना हा त्रास सहन करावा लागतो. जर तुम्ही बद्धकोष्ठतेचा सामना करत असाल तर काही दिवस जेवणानंतर पान अवश्य खावं. तसंच पानाचे काही तुकडे रात्रभर ग्लासभर पाण्यात टाकून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी हे पाणी प्यावं. यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. हे वाचा- खाताच तोंडातून येतो घोड्याच्या पळण्याचा आवाज; विचित्र समस्येमुळे तरुणी हैराण खरं तर पान खाण्याचे अनेक फायदे आहेत. जेवणानंतर पान खाल्ल्यास आपली पचनक्रिया (Digestion) चांगली राहते. अन्नपचन सुरळीत होतं. जेवणानंतर एक पान खाल्ल्यास पोटदुखी, गॅस, छातीत जळजळ होणं आदी समस्या दूर होतात. त्यामुळे देशातील बहुतांश भागांत जेवणानंतर पान खाण्याची प्रथा जपली गेली आहे. पानाचा वापर जखम लवकर भरून यावी, यासाठीही केला जातो. पानामध्ये अँटिऑक्सिडंट तत्व असतात. यामुळे जखम लवकर भरून येते. जर तुम्हाला जखम झाली तर पानाचा रस काढून जखमेवर लावावा, त्यानंतर त्याच पानाने जखम बांधावी. यामुळे काही कालावधीनंतर जखम भरून येते. जखमेवर पान हे अधिक गुणकारी मानलं जातं. हे वाचा- पाणी पिण्याचे हे साईड इफेक्ट अनेकांना माहीत नाहीत; दिवसा इतकं पाणी पिणं पुरेसं पान खाल्ल्यानं पुरुषांची लैंगिक शक्ती वाढण्यास मदत होते, ही बाब फार कमी लोकांना माहिती असेल. पानात अँटिडायबेटिक, अँटिइफ्लेमेटरी, अँटिइन्फेक्टिव्ह, अँटिसेप्टिक आणि दुर्गंधी दूर करणारे गुणधर्म असतात. पान खाल्ल्यानं टेस्टेस्टोरेन हार्मोनची (Testosterone hormone) पातळी वाढते. त्यामुळे पुरुषांमधली कामवासना वाढते. तसंच यामुळे पुरुषांमधली लैंगिक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरुषांना रात्री झोपण्यापूर्वी पान खाण्याचा सल्ला दिला जातो. (Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.