मुंबई, 22 ऑगस्ट : मानवी शरीर हे खूप गुंतागुंतीचं आणि विचित्र आहे. जर तु्म्हाला त्याबद्दल माहिती असेल तर तुम्हाला समजेल की ते एखाद्या यंत्रासारखं क्लिष्ट आहे, ज्यामध्ये अनेक लहान-मोठे भाग आहेत. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीनं शरीराची काळजी घेतली नाही तर ते यंत्राप्रमाणे खराब होतं. आज आम्ही तुम्हाला मानवी शरीराशी संबंधित 15 अशी अद्भुत तथ्य सांगणार आहोत, याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल. नॅशनल जिओग्राफिक वेबसाइटच्या सौजन्यानं ही सर्व तथ्यं एकत्रित करण्यात आली आहेत. मानवी शरीर हे खूप गुंतागुंतीचं असतं. शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे कोणत्याही कारणानं एखाद्या अवयवाला नुकसान झालं तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. शरीराशी संबंधित काही गोष्टी प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. तोंड हे शरीराचं प्रवेशद्वार मानलं जातं. आपल्या तोंडात दररोज एक लिटर लाळ तयार होत असते. काहीवेळा तुमचा मेंदू जागेपणाच्या तुलनेत तुम्ही झोपेत असताना जास्त सक्रिय असतो. मानवी शरीरातील सर्व धमन्या एकमेकांशी जोडल्या गेल्या तर पृथ्वीला चारवेळा वेढलं जाऊ शकते इतक्या त्या लांब असतात. हेही वाचा - Brain Boosting Food : मुलांचा मेंदू होईल सुपरफास्ट, फक्त आहारात सामील करा हे पदार्थ मसल्स हा शब्द लॅटिन शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ `छोटा उंदीर` असा होतो. प्राचीन काळात रोमन लोकांचे बायसेप्स उंदरासारखे दिसत होते, म्हणून ते लोक त्याला मसल अर्थात स्नायू म्हणू लागले. नॅशनल जिओग्राफिकच्या रिपोर्टनुसार, शरीरातून अतिशय संथ प्रमाणात प्रकाश उत्सर्जित होतो. हा प्रकाश मानवी डोळे पाहू शकत नाहीत. सर्वसामान्यपणे, माणसाच्या नाभीत 67 वेगवेगळ्या प्रजातींचे बॅक्टेरिया असतात. दरवर्षी आपण चार किलो त्वचा पेशी गमावतो, म्हणजेच दरवर्षी इतक्या प्रमाणात त्वचेच्या पेशी नष्ट होतात आणि नवीन तयार होतात. नवजात बाळ एक महिन्याचं झाल्यानंतर त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात. कदाचित ही बाब फार कमी लोकांना माहिती असावी. कोणत्याही प्रकारची माहिती आपल्या नसांमध्ये ताशी 400 किलोमीटर वेगाने प्रवास करते. माणसाचं हृदय त्याच्या संपूर्ण आयुष्यात 300 कोटींपेक्षा जास्त वेळा धडधडतं. माणसाचं डावं फुफ्फुस उजव्या फुफ्फुसापेक्षा 10 टक्क्यांनी लहान असतं. माणसाचे दात शार्क माशाच्या दातांप्रमाणेच मजबूत असतात. मानवी नाक हे अब्जावधी प्रकारचे वास ओळखू शकतं, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. लाजून हसणं ही निसर्गानं सजीव प्राण्यांमध्ये फक्त मानवाला दिलेली देणगी आहे. आपल्या शरीराच्या एकूण वजनापैकी 8 टक्के वजन हे फक्त रक्ताचं असतं. अशा या मानवी शरीराच्या निगडीत गोष्टी केवळ अद्भुतच म्हणायला हव्यात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







