मुंबई, 28 डिसेंबर : भारतातील (India) यशस्वी आणि नीतिमूल्य जपणारे उद्योगपती (businessman)म्हणून रतन टाटा (Ratan Tata) यांच्याकडे पाहिलं जातं. आज त्यांचा वाढदिवस (Birthday). रतन टाटा आज 83 वर्षांचे झाले असून अजूनही अखंडपणे कार्यरत आहेत.
रतन टाटा (Ratan Tana) यांचं पूर्ण नाव आहे रतन नवल टाटा. 1937 साली आजच्या दिवशी गुजरातेतल्या सूरत इथं त्यांचा जन्म झाला. सकारात्मक आणि व्यापक मानसिकतेमुळे ते आज या उंचीवर पोचले आहेत. आज टाटा यांच्या 83 व्या जन्मदिनी त्यांच्याविषयी कुतूहल असणाऱ्या चाहत्यांसाठी काही खास गोष्टी आज शेअर करतो आहोत.
- रतन टाटा यांनी हार्वर्ड बिजनेस स्कूल इथून 1975 साली आपलं शिक्षण पूर्ण केलं.
- आजवर देशाच्या प्रगतीमध्ये दिलेल्या लक्षणीय योगदानासाठी त्यांना भारत सरकारकडून पद्म विभूषण आणि पद्म भूषण अशा सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे. याशिवाय त्यांना उद्योग या विभागामधून 'सीएनएन आयबीएन इंडियन ऑफ द इयर' हासुद्धा किताब मिळाला आहे.
- रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा आणि आईचं नाव सुनी टाटा होतं.
- असं म्हणतात, की टाटा यांना पाळीव प्राणी खूप आवडतात. शिवाय विमान उडवणं हाही त्यांचा एक छंद आहे.
- जेआरडी टाटा यांच्यानंतर रतन टाटा हे टाटा उद्योगसमूहाचे पाचवे चेअरमन बनले.
- रतन टाटा यांनी सामान्य माणसाच्या आवाक्यातली कार म्हणून नॅनोची निर्मिती केली, तेव्हा त्यांचं नाव बातम्यांच्या मथळ्यांमध्ये सतत झळकत होतं.
- त्यांनी आपल्या करियरची सुरवात 1962 साली टाटा उद्योगसमूहातून वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी केली.
- आधी मुंबई आणि मग शिमला इथल्या शाळेतून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.
- रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र आणि टाटा ग्रुपचे संस्थापक जेआरडी टाटा यांचे दत्तक नातू आहेत.
रतन टाटा यांनी केवळ आपल्या कंपनीच्या महागड्या कार्सच विकल्या असं नाही, तर साधं मीठसुद्धा यशस्वीपणे विकत आपली विश्वासार्हता उंचावली. मीठ ही प्रत्येक सामान्य घरातली दैनंदिन गरज आहे. मीठ विकून टाटा शब्दश: घराघरात पोचले. रतन टाटा यांना जन्मदिनाच्या खूप सदिच्छा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratan tata, Tata group