Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Male Fertility: दुर्लक्ष टाळा, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी ठरू शकते धोकादायक

Male Fertility: दुर्लक्ष टाळा, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी ठरू शकते धोकादायक

पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता (Fertility) कमी होणं ही अलीकडच्या काळातली गंभीर समस्या आहे. ही क्षमता कमी होण्यामागे टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हा हॉर्मोन (Hormone) कारणीभूत असतो.

पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता (Fertility) कमी होणं ही अलीकडच्या काळातली गंभीर समस्या आहे. ही क्षमता कमी होण्यामागे टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हा हॉर्मोन (Hormone) कारणीभूत असतो.

पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता (Fertility) कमी होणं ही अलीकडच्या काळातली गंभीर समस्या आहे. ही क्षमता कमी होण्यामागे टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हा हॉर्मोन (Hormone) कारणीभूत असतो.

मुंबई, 23 जून : बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव आणि पोषक आहाराच्या अभावामुळे गंभीर आजार (Disease) होण्याचं प्रमाण वाढत आहे. हृदयविकार (Heart Disease) आणि डायबेटिसच्या (Diabetes) रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यासोबत अन्य शारीरिक समस्यादेखील निर्माण होत आहेत. पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता (Fertility) कमी होणं ही अलीकडच्या काळातली गंभीर समस्या आहे. पत्नीसोबतचं नातं उत्तम असावं, असं प्रत्येक विवाहित पुरुषाला वाटतं पण शारीरिक कमजोरीमुळे वैवाहिक जीवनावर (Married Life) परिणाम होतो. पुरुषांमधली प्रजनन क्षमता कमी होण्यामागे टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हा हॉर्मोन (Hormone) कारणीभूत असतो. परंतु, यावर काळजीपूर्वक उपचार करणं गरजेचं असतं. कारण टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंटसारख्या उपचारांमुळे अन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन पातळी वाढण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा (Ayurvedic treatment) पर्याय उपयुक्त ठरू शकतो. या विषयाचं वृत्त माहिती `झी न्यूज`नं दिलं आहे.

काय घ्यावी खबरदारी?

अमेरिकन न्यूरॉलॉजिकल असोसिएशनच्या मते, वाढत्या वयानुसार टेस्टोस्टेरॉनशी निगडित समस्या निर्माण होणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु, यासाठी टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी (Testosterone Replacement Therapy) घेणं शक्यतो टाळावं. त्याऐवजी पोषक आहार घ्यावा. टेस्टोस्टेरॉन पातळी वाढवण्यासाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदीक पद्धतींचा पर्याय हा सर्वोत्तम आहे.

टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांच्या शरीरातला एक हॉर्मोन आहे. या हॉर्मोनची पातळी कमी झाली तर शारीरिक विकासात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करणं आवश्यक आहे. शरीरात टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची कमतरता निर्माण व्हायला लागली तर प्रजनन क्षमता कमी होते, रक्तप्रवाह, एकाग्रता, मूड आणि स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागतो. तसंच पुरुषांचा स्वभाव रागीट आणि चिडचिडा होतो. टेस्टोस्टेरॉनची कमी असलेली पातळी वाढवण्यासाठी उपचार गरजेचे असले तरी ते करताना त्याचे धोकेही लक्षात घ्यायला हवेत. यासाठी सर्वप्रथम तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होण्यामागं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे जीवनशैली (Lifestyle) होय. जीवनशैलीत बदल झाल्यानं त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. सर्वसामान्यपणे वयाच्या चाळिशीनंतर अशा प्रकारची समस्या निर्माण होते. कारण पुरुषावर कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. त्यामुळे साहजिकच ताणतणाव वाढतात. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते, असं तज्ज्ञांचं मत आहे.

चेहऱ्यावरच्या केसांमुळे वैतागला आहात? 'हे' घरगुती उपायही ठरू शकतात प्रभावी

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यानंतर, जे लोक यावर उपचार घेण्याचा निर्णय घेतात, त्यांच्यासाठी तो सोपा नसतो. कारण टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट केल्यास त्यामुळे हार्ट अ‍ॅटॅकचा (Heart Attack) धोका वाढतो. त्यामुळे ही थेरपी घेण्याचा निर्णय विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावा. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नैसर्गिक, आयुर्वेदिक उपचारांची मदत घ्यावी आणि आरोग्यविषयक संभाव्य धोका टाळावा.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle