Home /News /lifestyle /

चेहऱ्यावरच्या केसांमुळे वैतागला आहात? 'हे' घरगुती उपायही ठरू शकतात प्रभावी

चेहऱ्यावरच्या केसांमुळे वैतागला आहात? 'हे' घरगुती उपायही ठरू शकतात प्रभावी

फेशियल हेअर (Facial Hair) अर्थात चेहऱ्यावर केस येणं हे महिलांना खूपच विचित्र भावना देणारं असतं. काही घरगुती उपायांनी देखील हे केस कमी केले जाऊ शकतात.

    मुंबई, 23 जून : नितळ चेहरा हे स्त्रीसौंदर्याचं एक मानक आहे. त्यामुळे फेशियल हेअर (Facial Hair) अर्थात चेहऱ्यावर केस येणं हे महिलांना खूपच विचित्र भावना देणारं असतं. त्यातून आरोग्याला धोका देणारं काहीही होत नाही; मात्र आपल्या चेहऱ्यावर केस आहेत, ही भावना अनेकांसाठी लाजिरवाणं  असते. त्यामुळे चेष्टामस्करीला किंवा टोमण्यांना सामोरं जावं लागू शकतं. हॉर्मोन्सचं असंतुलन (Hormonal Imbalance), टेस्टॉस्टेरॉनची (Testosterone) पातळी वाढणं, आनुवंशिकता, पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS आणि PCOD यांसारख्या समस्यांतूनही महिलांच्या चेहऱ्यावर केस येऊ शकतात. ते केस काढून टाकण्यासाठी मग अनेक कॉस्मेटिक उपचारांचं साह्य घेतलं जातं. काही वेळा लेसर ट्रीटमेंटही (Laser Treatment) केली जाते. या सगळ्या उपचारपद्धती महागड्या असतात. त्या सगळ्यांनाच परवडण्यासारख्या नाहीत. काही घरगुती उपायही यावर प्रभावी ठरतात. त्याबद्दलची माहिती घेऊ या. 'टाइम्स नाऊ न्यूज'ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लिंबाचा रस, साखर आणि मध यांचा वापर करून चेहऱ्यावरच्या केसांपासून सुटका मिळवता येऊ शकते. हे तिन्ही घटक एकत्र करून त्यात थोडं पाणी घालावं. हे मिश्रण गरम करून त्यापासून नैसर्गिक घरगुती वॅक्स (Natural Home made Wax) तयार करा. हे वॅक्स चेहऱ्याच्या केस आलेल्या भागांवर लावावं. त्यावर स्ट्रिप (Strip) लावून विरुद्ध दिशेने खेचावं. जर्दाळूची (Apricot) पावडर मधात (Honey) मिसळल्यास एक दाट मिश्रण तयार होतं. त्याचा मास्कप्रमाणे वापर करावा. म्हणजेच हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावावं. ते चेहऱ्यावर लावताना बोटं गोलाकार फिरवावीत. त्यामुळे चेहऱ्यावरच्या केसांचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. तिसरा उपाय आहे तो ओटमील (Oatmeal) आणि केळ्याच्या मिश्रणाचा. ओटमील आणि केळी यांचं मिश्रण करून पेस्ट तयार करावी. त्याचा स्क्रब म्हणून वापर करावा. टॅनिंग, डेड स्किन, फेशियल हेअर या सगळ्यापासून नैसर्गिकरीत्या सुटका मिळण्यासाठी या पेस्टचा उपयोग होतो. या मिश्रणात अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जळजळ, दाह, सूज आदी काही त्रास असले, तर त्यापासूनही सुटका मिळते. एग व्हाइट्स (Egg Whites) अर्थात अंड्यातला पांढरा भाग आणि कॉर्न स्टार्च (Corn Starch) यांच्या मिश्रणाचा वापर नियमितपणे केल्यास फेशियल हेअर्सचं प्रमाण कमी होऊ शकतं. हा मास्क लावून काही वेळानंतर चेहरा थंड पाण्याने नीट धुतल्यावर त्याला चिकटलेले केस उपटून येतात. पावसळ्यातही उजळेल तेलकट चेहरा, 'या' सोप्या उपायांची करा अंमलबजावणी भिजवलेले मसूर आणि बटाट्याचा ज्यूस, तसंच मध आणि लिंबाचा रस असे सगळे घटक एकत्र करून त्यापासून घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर केस आलेल्या भागावर 20 मिनिटं लावून ठेवावी. ते सुकू द्यावं. सुकल्यानंतर ते धुऊन टाकावं. हे घट्ट मिश्रण नैसर्गिकरीत्या केस काढून टाकण्यास मदत करतं. बटाट्याचा ज्यूस फेशिअर हेअर्सचं ब्लीचिंग करतो. त्यामुळे ते पटकन दिसून येत नाहीत.
    First published:

    Tags: Beauty tips, Woman hair

    पुढील बातम्या