Home /News /lifestyle /

काय? केसांचा एक विग बनवण्यासाठी नक्की किती लागतो वेळ? अशी असते किचकट प्रक्रिया

काय? केसांचा एक विग बनवण्यासाठी नक्की किती लागतो वेळ? अशी असते किचकट प्रक्रिया

साधा दिसणारा विग तयार करण्याचं काम कठीण आणि किचकट

साधा दिसणारा विग तयार करण्याचं काम कठीण आणि किचकट

सध्या विग वापरण्याचा जोरदार ट्रेंड (Trend) आहे. विगांची मागणी वाढल्याने विग निर्मिती इंड्रस्ट्री तेजीत आहे.

    मुंबई, 27 जानेवारी:  कुठल्याही व्यक्तीचं सौंदर्य केसांमध्ये (Hair) असतं असं म्हटलं जातं. लांब (Long), दाट (Thick), काळेभोर केस असलेली स्त्री जास्त सुंदर (Beautiful) दिसते तर दाट केस असलेला पुरुषही जास्त हँडसम (Handsome) दिसतो. मात्र, सध्याची धकाधकीची लाइफस्टाईल (Lifestyle), खाण्या-पिण्याच्या सवयी (Eating Habits), प्रदूषण (Pollution) यांचा परिणाम केसांवर होताना दिसतो. किशोरवयीन असो किंवा वृद्ध सर्व वयोगटांमध्ये केस गळतीची (how go control Hairfall) समस्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. अनेक तरुणांना तर अकाली टक्कल (Baldness) पडण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. अकाली टक्कल पडल्यानं किंवा मोठ्या प्रमाणात केस गळती होत असल्यास एकूण व्यक्तिमत्वावर परिणाम होण्याची भीती असते. काहींचा तर आत्मविश्वास (Confidence) नाहीसा होऊन मानसिक आरोग्यासुद्धा अस्थिर होतं. टक्कल पडलेल्या व्यक्तींसाठी कृत्रीम केसांचा म्हणजे विगचा (Wig) वापर करणं हा चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे. सध्या विग वापरण्याचा जोरदार ट्रेंड (Trend) आहे. विगांची मागणी वाढल्याने विग निर्मिती इंड्रस्ट्री तेजीत आहे. विग निर्मितीची प्रक्रिया अतिशय सोपी असेल, असं प्रथमदर्शी वाटतं. मात्र, वरील बाजून अतिशय साधा दिसणारा विग तयार करण्याचं काम कठीण आणि किचकट आहे. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पुरुषांसाठी लहान केसांचे तर, महिलांसाठी किमान आठ इंच लांब असलेल्या केसांपासून विग तयार केले जातात. महिलांच्या विगमध्ये आठ इंचापेक्षा कमी लांब केस वापरता येत नाहीत. जर केसांची लांबी कमी असेल तर त्यापासून पाहिजे तसा विग तयार होत नाही. विग दोन प्रकारे बनवले जातात. कृत्रिमरित्या बनवलेल्या पॉलिस्टर (Polyester) केसांपासून आणि मानवानं दान केलेल्या किंवा विकलेल्या केसांपासून विगाची निर्मिती होते. मानवी केसांपासून (Human Hair) तयार केलेला विग हा सर्वोत्कृष्ट मानला जातो. मानवी केसांचे विग दिसायला नॅचरल (Natural Look) असल्यामुळे त्यांची मागणी आणि किंमत दोन्हीही जास्त असते. शिल्लक अन्नपदार्थ पुन्हा गरम करून खाताय; मग एकदा तरी हे तुम्ही पाहायलाच हवं इनसाइडरनं दिलेल्या बातमीनुसार, बहुतेक विग हे हातानं तयार केले जातात. त्यामुळे त्यासाठी बराच वेळ लागतो. एका वेणीतील केसांचं विगमध्ये रूपांतर करण्यासाठी साधारण 50 तासांपासून ते 6 महिन्यांपर्यंत कालावधी लागू शकतो. विग तयार करण्यासाठी सर्वांत अगोदर कापलेले मानवी केस गोळा केले जातात. नंतर या केसांचं अतिशय बारीकाईनं ट्रिमिंग (trimming) केलं जातं जेणेकरुन एकही खराब किंवा लहान-मोठा केस शिल्लक राहणार नाही. त्यानंतर हे केस धुतले जातात. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग असल्यास त्यांचं निर्जंतुकीकरणदेखील (Disinfection) केलं जातं. नंतर त्यांचा रंग आणि आकार निश्चित केला जातो. शेवटी, फाउंडेशनवर केस लावण्याची सर्वात कठीण प्रक्रिया सुरू होते. विगमधील फाउंडेशन (foundation) हा डोक्याला अटॅच केला जाणारा भाग असतो. याच फाउंडेशनच्या मदतीनं विग डोक्यावर व्यवस्थित राहतो. फाउंडेशनमध्ये केस अडकवण्यासाठी सुया वापरल्या जातात. विशिष्ट प्रकारच्या गाठींचा (Knots) वापर करून केस अडकवले जातात. संपूर्ण विगमध्ये अशा 30 ते 40 हजार गाठी असतात. एकूणच, विग तयार करण्याची प्रक्रिया खूपच किचकट आणि वेळखाऊ असते. म्हणून त्यांच्या किंमतीदेखील जास्त असतात.
    First published:

    Tags: Lifestyle, Woman hair, Women hairstyles

    पुढील बातम्या