मांसाहारी अन्न - चिकन, मांस आणि अंडी यांसारखे मांसाहार प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो. पण हे मांसाहारी पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ले तर अन्नातून विषबाधा आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे फक्त ताजे मांसाहार खाणे चांगले. उच्च प्रथिनयुक्त अन्नामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते, अशा परिस्थितीत ते पुन्हा गरम करून खाल्ल्यास शरीराला हानी पोहोचते.