जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कसुरी मेथी आणि मेथीत काय फरक? पाहा शेफ कुणाल कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे घरीच करा कसुरी मेथी

कसुरी मेथी आणि मेथीत काय फरक? पाहा शेफ कुणाल कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे घरीच करा कसुरी मेथी

कसुरी मेथी आणि मेथीत काय फरक? पाहा शेफ कुणाल कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे घरीच करा कसुरी मेथी

कसुरी मेथी हा मसाल्याचा पदार्थ पंजाबी भाज्या आणि इतर पदार्थांमध्ये आवर्जून वापरला जातो. आपली नेहमीची मेथीची भाजी आणि हा मसाला यात काय फरक आहे. घरच्या घरी कशी बनवायची कसुरी मेथी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली माहिती पाहा VIDEO

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 28 ऑगस्ट: खाद्यपदार्थ तयार करताना विविध प्रकारच्या मसाल्यांचा (Spices) वापर केला जातो. कसुरी मेथी (what is Kasoori Methi) हा त्यापैकीच एक पदार्थ. कसुरी मेथीचा वापर खाद्यपदार्थांचा (Food habits) स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. कसुरी मेथीमुळे पदार्थाला एक वेगळी आणि चांगली चव, तसंच गंध येतो. अनेक जणांचा कसुरी मेथीबाबत गोंधळ होतो. मेथीच्या सुकवलेल्या पानांनाच कसुरी मेथी म्हणतात, असं अनेकांना वाटतं. कसुरी मेथीतील कसुरी या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. देशात कसुरी मेथीचं सर्वाधिक उत्पादक राजस्थान (Rajasthan)आणि पंजाब (Punjab) या दोन राज्यांत होतं. पाकिस्तानातला कसूर प्रांतदेखील कसुरी मेथीच्या सर्वाधिक उत्पादनासाठी ओळखला जातो. शेफ कुणाल कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) हँडलवर नुकताच एक व्हिडिओ (Video) पोस्ट केला आहे. वजन कमी करण्यासाठी सरळ नाही उलटं चाला; पाहा कसा फायदा होतो मेथी आणि कसुरी मेथीत नेमका काय फरक आहे, हे या व्हिडिओत सांगण्यात आलं आहे. तसंच कसुरी मेथीतल्या कसुरी या शब्दाचा अर्थदेखील या व्हिडिओत सांगण्यात आला आहे. कसुरी मेथी कशी असते? मेथीची (Fenugreek) सुकलेली पानं म्हणजेच कसुरी मेथी असं तुम्ही समजत असाल तर ते चुकीचं आहे. मेथीच्या सुकलेल्या पानांना कसुरी मेथी असं म्हटलं जात नाही. कसुरी मेथी ही मेथीची वेगळी जात (Variety) आहे. देशात कसुरी मेथीचं सर्वाधिक उत्पादन राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात होतं. तसंच पंजाबमध्येदेखील कसुरी मेथीचं उत्पादन घेतलं जातं. पाकिस्तानातल्या Pakistan) कसूर या प्रांतावरून हे कसुरी हे नाव पडलं आहे. कारण या प्रांतात कसुरी मेथीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. कसूर प्रांतातली मेथी ती कसुरी मेथी. घरच्या घरी कशी करायची कसुरी मेथी? कसुरी मेथी ही नेहमीच्या मेथीपेक्षा थोडी वेगळी असते. कसुरी मेथी नसेल, तर गरजेनुसार नेहमीच्या मेथीचा वापर केला जातो; मात्र नेहमीच्या मेथीमुळे कसुरी मेथीसारखी चव आणि सुवास पदार्थाला अजिबात येत नाही. नेहमीच्या मेथीची पानं धुवून घेऊन ती कॉटनच्या कापडावर ठेवून कडक उन्हात सुकवून घ्यावीत.

    जाहिरात

    ही पानं सुकल्यानंतर अधिक क्रिस्पी म्हणजेच कुरकुरीत होतात. ही पानं तुम्ही पदार्थ तयार करताना कसुरी मेथीऐवजी वापरू शकता. ही पानं कडक उन्हात सुकवणं शक्य नसेल, तर तुम्ही ही पानं मायक्रोवेव्हमध्येदेखील सुकवू शकता. त्यामुळे कसुरी मेथीची उणीव काही प्रमाणात भरून काढता येऊ शकते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: chef , food
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात