मुंबई, 19 जून : आले हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि खोकला, सर्दी किंवा ताप इत्यादींसारख्या अनेक आयुर्वेदिक गुणधर्मांपासून आपले संरक्षण करते. एवढेच नाही तर जेवणाच्या चवीसाठीही याचा भरपूर वापर केला जातो. याच कारणामुळे आले देखील भारतातील मुख्य मसाल्यांपैकी एक आहे. मात्र हे आलं घरात साठवावं कसा हा प्रश अनेकांना पडतो. अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेले आले साठवणे हे अनेकांना आव्हानात्मक काम वाटते. बाजारातून आलं आणल्यानंतर ते स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवले जाते. मात्र त्यानंतरही ते सुकते किन्वा खराब होते. अशावेळी आल फ्रिजमध्ये साठवावं की नाही, हे कळत नाही. चला तर मग जाणून घेऊया फ्रिजमध्ये आले कोणत्या पद्धतीने साठवल्यास ते जास्त काळ टिकेल. फ्रिजमध्ये अशा प्रकारे साठवा आलं… ओले ठेवू नका : आलं फ्रीजमध्ये ठेवताना ते ओले ठेवू नका. जर तुम्ही अद्रक पाण्याने धुतले असेल तर ते काही वेळ पंख्याखाली चांगले कोरडे करून मगच ते फ्रीजमध्ये ठेवावे. तपकिरी कागद वापरा : जेव्हा तुम्ही आलं फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा ते तपकिरी कागदात गुंडाळून किंवा तपकिरी कागदाच्या पिशवीत ठेवू शकता. असे केल्याने त्यात ओलावा राहणार नाही आणि आलं बराच काळ टिकेल. हवाबंद कंटेनर वापरा : जर तुम्हाला आलं जास्त काळ साठवायचे असेल तर तुम्ही त्यासाठी हवाबंद कंटेनर वापरू शकता. इतकेच नाही तर फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवण्यासाठी तुम्ही झिपलॉक प्लास्टिक पिशव्या देखील वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा की ते ओले नसावेत. क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवा : आल्यासाठी सर्वोत्तम तापमान म्हणजे फ्रिजचा क्रिस्पर ड्रॉवर. सर्वप्रथम आले नीट धुवा आणि हवेत कोरडे करा आणि प्लास्टिक किंवा कागदाच्या पिशवीत गुंडाळा आणि क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवा. चिरलेले आले फ्रिजमध्ये ठेऊ नका : सोलून किंवा कापून आले फ्रीजमध्ये ठेवले तर ते सुकते आणि खराब होते. म्हणूनच आले कापून किंवा सोलून न काढता फ्रीजमध्ये ठेवणे चांगले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







