जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नको सुगामेवा खराब होण्याची चिंता! असा साठवून ठेवला तर नाही लागणार किडे

नको सुगामेवा खराब होण्याची चिंता! असा साठवून ठेवला तर नाही लागणार किडे

बाळाचं प्लॅनिंग करताना दोघांनीही ड्रायफ्रूट्स खायला सुरूवात केली पाहिजे. ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट असतात. त्यामुळे शरीरामध्ये रिअॅक्टिवे ऑक्सिजन स्पीशीज केमिकल कमी होतं हे केमिकल फर्टिलिटीवर परिणाम करत असतं.

बाळाचं प्लॅनिंग करताना दोघांनीही ड्रायफ्रूट्स खायला सुरूवात केली पाहिजे. ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट असतात. त्यामुळे शरीरामध्ये रिअॅक्टिवे ऑक्सिजन स्पीशीज केमिकल कमी होतं हे केमिकल फर्टिलिटीवर परिणाम करत असतं.

कधीकधी जास्त प्रमाणात ड्राय फ्रुटखरेदी केले असतील तर, ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्टोअर करून ठेवायचं टेन्शन येतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

 नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : ड्राय फ्रुट खाण्या फायदे **(**Benefits of Dru fruit) माहिती नाहीत अशी व्यक्ती शोधून सापडणं कठीणच आहे. निरोगी (Healthy) राहण्याचा पहिला नियम म्हणजे आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं. यासाठी फळं आणि भाज्या व्यतिरिक्त ड्राय फ्रुटही **(**Dry Fruit) आहारात असावेत. काजू, बदाम पिस्ता,मनुका,आक्रोड खाण्याने फायदा होतो. वायानुसार हाडं कमजोर (Bone Density) होण्याचा त्रास होऊ नये असं वाटत असेल, केसांच्या वाढीसाठी, शरीराल उर्जा राहण्यासाठी ड्राय फ्रुट खाण्याने फायदा होतो. सुकामेवा व्हिटॅमीनचा खजिना आहेत. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, लोह, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि झिंक सारखे घटक असतात. त्यामुळे लहान मुलांपासून वयोवदृद्धांपर्यंत सगळेचजण सुकमेवा आवडीने खातात. त्यामुळेच घरामध्ये ड्राय फ्रुट आणले जातात. काही व्यक्ती घरात जास्त प्रमाणात ड्राय फ्रुट लागणार असतील तर, किलोने खरेदी करतात. पण, खरा प्रश्न असतो ड्राय फ्रुट आणल्यानंतर ते साठवायचे कसे (****How to Store). कारण वातावरण बदललं (Atmosphere Change) की ड्राय फ्रुटही खराब होतात. त्यांनी किड लागली तर, चव बदलते, खाण्याजोगे राहत नाहीत. अशावेळेस महागडे ड्राय फ्रुट (Expensive Dry Fruit) फेकून द्यायला जीवावर येतं. त्यामुळे ड्राय फ्रुट घरात साठवण्याच्या 4 पद्धातींची माहिती घ्या. या पद्धतीने साठवले तर, लवकर खराब होणार नाहीत. 1. ड्रायफ्रुट घेताना लक्षात ठेवा. सुकामेवा खरेदी करताना त्याची वास पाहा. कोणत्याही प्रकारचा वास येत असेल तर, खरेदी करू नका. शक्यतो सुट्टे मिळणारे ड्राय फ्रुट घेण्यापेक्षा. पॅकिंगमध्ये मिळणारे घ्यात म्हणजे जास्त दिवस फ्रेश राहतील. वर्षभरासाठी खरेदी करण्यापेक्षा 2 ते 3 महिने टिकतील एवढेच घ्या. ( पर्यटनाची भुरळ घालणाऱ्या लोन स्किम स्वीकारण्याआधी नियम वाचा; नाहीतर पस्तवाल! ) 2. हवा बंद डब्ब्यांचा वापर ड्राय फ्रुट किंवा कोणताही सुका पदार्थ साठवण्यासाठी एयर टाईट कंटेनरचा वापर करा. त्यामुळे हवा लागून कराब होण्याची भीती राहणार नाही. अशा डब्यांमधून सुकामेवा बाहेर काढताना कोरड्या हातांनीच काढावा. डब्याचं झाकण नेहमी घट्टा लावावं. ( ‘या’ उपायांनी मिनिटात पाली घर सोडून पळून जातील; संपेल कायमचा त्रास ) 3. थंठ ठिकाणी ठेवा बरेच लोक सुकामेवा स्वयंपाक घरात ठेवतात. पण, स्वयंपाक घरातल्या उष्णतेमुळे खराब होऊ शकतात. ड्राय फ्रुट जास्त दिवस टिकवायचे असतील तर, त्यांनी थंड आणि कारड्या ठिकाणी ठेवा. सुकामेवा इतर सामानबरोबर ठेवू नका. फ्रिजमध्ये ठेवल्याल त्यातील थंड तापमानामुळेही खराब होऊ शकतात. ( मसाल्याच्या डब्यातला पदार्थ सांधेदुखीत फायदेशीर; युरिक अ‍ॅसिडचा त्रास होईल कमी ) 4. भाजून ठेवा जास्त दिवस ड्राय फ्रुट टिकवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांना थोडं बाजावं. म्हणजे त्यांच्यात निर्माण झालेली दमटपणा निघून जाईल. त्यामुळे जात दिवस टिकतील. 5. छोट्या पिशव्यांमध्ये ठेवा सुकामेवा ठेवण्यासाठी झिप लॉक पिशव्या वापराव्यात. जास्त प्रमाणात सुकामेवा आणला असेल तर, त्याचे छोटेछोटे भाग करून त्यात ठेवावेत गरजे प्रमाणे एक पिशवी काढून वापरावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात