advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मसाल्याच्या डब्यातला पदार्थ सांधेदुखीत फायदेशीर; युरिक अ‍ॅसिडचा त्रास होईल कमी

मसाल्याच्या डब्यातला पदार्थ सांधेदुखीत फायदेशीर; युरिक अ‍ॅसिडचा त्रास होईल कमी

सांधेदुखीचा त्रास लवकर सुरू झाला असेल तर, त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढलं असेल तर घरगुती उपाय करा.

01
युरिक अ‍ॅसिड वाढलं असेल तर, त्यासाठी हळद वापरून पाहा, हळद खाण्याबरोबर सांध्यांवर लावण्यानेही फायदा होतो.

युरिक अ‍ॅसिड वाढलं असेल तर, त्यासाठी हळद वापरून पाहा, हळद खाण्याबरोबर सांध्यांवर लावण्यानेही फायदा होतो.

advertisement
02
अलीकडच्या काळात यूरिक अ‍ॅसिड वाढणं एक गंभीर समस्या झाली आहे. आपलं शरीर किडनी मार्फत यूरिक ॲसिड फिल्टर करतं.

03
शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिड वाढलं असेल तर, हे अ‍ॅसिड फिल्टर करण्यात अडचणी येतात आणि त्यामुळेच रक्तात यूरिक ॲसिड वाढण्यास सुरुवात होते आणि सांधेदुखीची समस्या उद्भवते.

04
यूरिक अ‍ॅसिड वाढलं तर सांध्यांमध्ये वेदना व्हायला लागतात. चालणं, उठणं-बसणं देखील कठीण होऊन जातं. यूरिक अ‍ॅसिड शरीरात वाढायला लागलं की ते आपल्या संध्यांजवळ जमा व्हायला लागतं. हे कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत.

05
या त्रासावर हळद गुणकारी ठरेत. सगळ्यांच्या किचनमध्ये हळद असतेच. युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी हळद सर्वात जास्त प्रभावी ठरते. यात कर्क्युमिन नावाचा घटक असतो. जो युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. युरिक ऍसिडचं प्रमाण जास्त असल्यास संधीवाताच त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

06
हायपर्यूरिसेमिया असलेल्या लोकांना सांधेदुखी,स्नायूंमध्ये अवघडलेपणा आणि सूज येते. सांधेदुखी संदर्भात 2016 साली करण्यात आलेल्या संशोधनानुसार कर्क्युमिन उपयोगी ठरतं.

07
तर, 2013 मध्ये झालेल्या रिसर्चनुसार कर्क्युमिनमध्ये फ्लेक्सोफिटॉल नावाचा घटक असतो. ज्यामुळे वेदना कमी होतात. तज्ज्ञांच्यामते युरिक ऍसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी हळदीचा वापर करता येतो.

08
हळद आरोग्यासाठी उत्तम आहे. दररोज रात्री हळदीचं दूध प्यायल्याने पायांची सुज कमी होते. हळदीचं दूध करताना त्यात चिमूटभर मिरी पावडरचाही वापर करावा. याशिवाय हळदीचा चहादेखील पिता येतो.

09
हळदीमध्ये आढळणाऱ्या कर्क्युमिनच्या कॅप्सूल देखील संधिवातासाठी घेता येतात. पण, अशा कॅप्सूल घेतांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हळदिची पेस्ट दुखणाऱ्या सांध्यांवर लावल्यास आरामही पडतो.

10
त्यासाठी थोडीशी हळद आणि पाणी मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण वेदना होणाऱ्या भागावर लावा. याशिवाय ओल्या हळदीचाही वापर करता येतो.

  • FIRST PUBLISHED :
  • युरिक अ‍ॅसिड वाढलं असेल तर, त्यासाठी हळद वापरून पाहा, हळद खाण्याबरोबर सांध्यांवर लावण्यानेही फायदा होतो.

    MORE
    GALLERIES