मुंबई, 07 जून : बऱ्याचदा होतं असं की स्वयंपाक घरात काही वस्तू महिनो-महिने पडलेल्या असतात. ज्यामुळे त्यांना किडे-मुंग्या लागण्याची भिती असते. शिवाय काही कडधान्यांना भूंगे देखील लागतात. शिवाय स्वयंपाक घरात झुरळ फिरणं तर काही घरात अगदी सामान्य झालं आहे. त्यात रवा हा एक असा पदार्थ आहे ज्याचा आपण हलवा, उपमा किंवा इडली बनवणे अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतो, तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु अनेक वेळा त्यात अळी किंवा किडे लागतात. त्यामुळे रवा खराब होतो आणि नंतर तो खाल्ल्याने धोका देखील वाढतो. गृहिणींसाठी ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही रव्यातील किडे काढू शकता, शिवाय यामुळे पुढे किडे होणार देखील नाहीत. रव्यातील कीटकांपासून सुटका करण्यासाठी या गोष्टीं करतील मदत 1. सूर्यप्रकाश कडक उन्हात कीटकांचा सुगाव लागत नाही. त्यामुळे ते उष्णतेपासून पळून जातात, कीटकांपासून मुक्त होण्यासाठी ही एक जुनी पद्धत आहे. रव्यासह अन्नपदार्थ वेळोवेळी सूर्यप्रकाशाला दाखवत राहा, ज्यामुळे कीटकांचा धोका कमी होतो. 2. कडुलिंबाची पाने कडुलिंबाचे औषधी गुणधर्म आपण सर्वच जाणतो, त्याला कीटकांचा शत्रू देखील म्हटले जाते. जर तुम्ही त्याचा वापर केला, तर तुम्ही रवा सुरक्षित ठेवू शकता. यासाठी रव्याच्या पेटीत नेहमी कडुलिंबाची काही पाने ठेवा, यामुळे किडे आजूबाजूला येणार नाहीत. 3. कापूर कापूर वापरल्याने रव्याच्या भांड्यात किडे येत नाहीत. कापूरचा वास तीव्र असेल तर या कीटकांना ते आवडत नाही. पण जेव्हा तुम्ही रवा वापरायला घ्याल तेव्हा तो चाळून घ्या. कापरामुळे रव्यात असलेले कीटक मरतील आणि नंतर नवीन कीटक सुद्धा येणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.