जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अरारारा खतरनाक! सोलापूर जिल्ह्यातल्या ‘या’ गावात चक्क घरोघरी पाळतात किंग कोब्रा

अरारारा खतरनाक! सोलापूर जिल्ह्यातल्या ‘या’ गावात चक्क घरोघरी पाळतात किंग कोब्रा

अरारारा खतरनाक! सोलापूर जिल्ह्यातल्या ‘या’ गावात चक्क घरोघरी पाळतात किंग कोब्रा

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा (battis shirala) हे गाव सापांचं गाव म्हणूल ओळखले जायचं. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील असं एक गाव आहे. तिथे लोक नागांचे (king cobra) घरामध्ये मोकळ्या मनाने स्वागत करतात

  • -MIN READ
  • Last Updated :

सोलापूर,10 मे : देशात सापाला (king cobra) खूप महत्त्वाचे स्थान आहे. शेतकऱ्यांचा (farmer) मित्र म्हणून ही सापाला संबोधले जाते. भारतात सापाला देव माणून त्यांची पूजा केली जाते. दरम्यान साप चावल्यानंतर त्याचे विष प्राणघातक असल्याने लोक सापांना घाबरतात, तर दुसरीकडे नागपंचमीला (nag panchami) नागांची पूजा करत लोक मोठ्या उत्साहाने सन साजरा करतात. पण सणाव्यतिरिक्त कोणाच्या घरी किंवा आसपास साप आला तर लोकांंची भंबेरी उडताना आपण कित्येक वेळा पाहिले आहे. यापुर्वी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा (battis shirala) हे गाव सापांचं गाव म्हणूल ओळखले जायचं याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील असं एक गाव आहे. तिथे लोक सापांचे घरामध्ये मोकळ्या मनाने स्वागत करतात. येथे लोकांच्या घराचे दरवाजे सापांसाठी नेहमीच उघडे असतात.   सोलापूर जिल्ह्यात शेतपाळ नावाचे गाव आहे. त्या गावातील प्रत्येक घरात खुलेआम साप फिरत असतात. दरम्यान इतर ठिकाणी आपल्या घरात साप आलेल पाहून लोक घाबरतात, पंरतु या गावात लोक सापांचे स्वागत करतात आणि ते ही किंग कोब्रा! याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. या गावात नाग प्रत्येक घरात मोकळेपणाने फिरत असून त्यांना कोणीही अडवत नाही. हे ही वाचा : जनतेला बसत आहेत महागाईचे चटके; गेल्या 10 वर्षांत डाळ, तांदूळ, खाद्यतेलाच्या किंमतीत `अशी` झाली वाढ ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या 2018 च्या रिपोर्टनुसार, या गावातील 2600 हून अधिक ग्रामस्थ नागाची पूजा करतात. इथं माणूस ना सापांना इजा करत नाही ना साप माणसांना इजा पोहोचवतात. दोघेही एकमेकांसोबत राहतात, एकमेकांना घाबरत नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, येथे माणसाला साप चावल्याची एकही घटना घडलेली नाही. इथल्या घरांव्यतिरिक्त शाळेच्या वर्गातही साप येतात, पण मुले सापांमध्येच वाढलेली असल्याने त्यांना अजिबात भीती वाटत नाही. येथे आपले नवीन घर बांधणारे लोक सापांसाठी एक छोटा कोपरा बनवतात ज्याला देवस्थानम असे नाव दिले जाते. ज्या घरात साप येऊन बसतात त्या प्रत्येक घरात हा कोपरा असतो. सापांसोबत राहण्याची ही प्रथा कधी आणि कशी सुरू झाली हे कोणालाच माहीत नाही, पण आता सापही इथल्या लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. इथे बाहेरचा माणूस आला तर त्याला भीती वाटणे साहजिक आहे. अशा स्थितीत अंडी, दूध आणि नशीब सोबत आणावे, असा सल्ला येथील लोकांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात