जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / किटो डाएटने वाढतोय हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका? या लोकांनी घ्यावी जास्त काळजी

किटो डाएटने वाढतोय हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका? या लोकांनी घ्यावी जास्त काळजी

किटो डाएटने वाढतोय हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका? या लोकांनी घ्यावी जास्त काळजी

किटो डाएटला केटोजेनिक किंवा लो-कार्ब डाएट असेही म्हणतात. आहारात कार्बोहायड्रेट कमी आणि चरबी जास्त असल्यामुळे कर्बोदकांमधे ऊर्जा मिळण्याऐवजी शरीर चरबीपासून ऊर्जा घेऊ लागते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 मार्च : आजकाल किटो डाएट खूप ट्रेंडमध्ये आहे आणि जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यात हे डाएट जास्त ट्रेंडमध्ये आहे. होय, किटो डाएट वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम वजन कमी डाएट पर्यायांपैकी एक मानले जाते. किटो डाएटमध्ये प्रामुख्याने कर्बोदकांचे सेवन पूर्णपणे कमी करावे लागते आणि प्रथिने आणि चरबीयुक्त पदार्थांचा आहारात अधिक समावेश करावा लागतो. किटो डाएटला केटोजेनिक किंवा लो-कार्ब डाएट असेही म्हणतात. आहारात कार्बोहायड्रेट कमी आणि चरबी जास्त असल्यामुळे कर्बोदकांमधे ऊर्जा मिळण्याऐवजी शरीर चरबीपासून ऊर्जा घेऊ लागते. मात्र हा डाएट घेण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. हे देखील महत्त्वाचे आहे. कारण कधीकधी विशिष्ट डाएटचे पालन केल्याने त्याच्या फायद्याऐवजी नुकसान होते.

हेल्दी डाएट आणि एक्सरसाइजनेही कमी होत नाही वजन? ‘हे’ असू शकते कारण, वाचा उपाय

आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या वार्षिक वैज्ञानिक सत्रात वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डिओलॉजीसह सादर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, किटो डाएटमुळे वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण दुप्पट होते. यामुळे छातीत दुखणे (एनजाइना), धमन्यांमधील अडथळा, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी स्थितींचा धोका देखील वाढू शकतो.

News18लोकमत
News18लोकमत

कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया सेंटर फॉर हार्ट लंग इनोव्हेशन युनिव्हर्सिटीच्या आणि अभ्यासाच्या प्रमुख लेखिका, युलिया इटान म्हणाल्या, “आमच्या अभ्यासात असे आढळले आहे की, कमी-कार्बोहायड्रेट आणि उच्च चरबीयुक्त आहाराचे नियमित सेवन केल्याने एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.” या लोकांनी किटो डाएटपासून राहावे दूर - गर्भवती महिलांनी किटो डाएटची निवड करू नये, कारण यामुळे त्या निरोगी गर्भधारणेसाठी आवश्यक पोषक तत्वांपासून वंचित राहू शकतात. - जर तुम्हाला खाण्याच्या विकाराने म्हणजेच इटिंग डाएटने ग्रासले असेल, तर प्रतिबंधात्मक आहार म्हणजेच रेस्ट्रीक्टेड डाएट पूर्णपणे टाळावे. कारण यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. - ज्या लोकांना हायपोथायरॉईडीझम आहे त्यांनी किटो डाएटचे पालन करू नये. कारण त्याचा त्यांच्या हार्मोन्सच्या पातळीवर विपरित परिणाम होऊ शकतो. Height Increase Tips : मुलांची उंची वाढवायचीये? रोज 2 मिनिटे करा एक्स्पर्टने सांगितलेले हे काम - किटो डाएट लहान मुले आणि किशोरवयीन मुलांनी पाळू नये. कारण यामुळे त्यांच्या शरीरात अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या वाढत्या शरीर आणि मेंदूच्या विकासात अडथळा निर्माण होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात