नवी दिल्ली, 5 सप्टेंबर : आपल्या भारतीय संस्कृतीत (Indian Culture) अनेक परंपरा आणि रिती-रिवाज आहेत. प्रत्येक सण, समारंभ आणि सोहळ्यानुसार या परंपरा आणि रिवाज वेगवेगळे आहेत. आपल्याकडे विवाह समारंभ (Wedding) किंवा अन्य शुभ कार्याप्रसंगी 11, 21,51 किंवा 101 रुपये भेट किंवा आहेर (Gift) म्हणून देण्याची पध्दत आहे. जितकी काही रक्कम आपण आहेर म्हणून देणार आहोत, त्यात 1 रूपया अधिक दिला जातो. ही परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आलेली असून, ती आजही कायम आहे. या मागे शुभशकून (Good Will) असं एक कारण मानलं जातं. या व्यतरिक्त यामागे अजून काही कारणं दडलेली आहेत. याबाबतची माहिती देणारं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`नं दिलं आहे. जाणून घेऊया सविस्तर… शुभ कार्यावेळी आपण संबंधित व्यक्तीला काही ना काही भेट किंवा आहेर देत असतो. त्यातही प्राधान्यानं रोख रक्कम देण्याकडे काही लोकांचा कल असतो. ही रोख रक्कम आहेर म्हणून देताना ती पूर्णांकात असावी, असा नियम पाळला जातो. जर आपण संबंधित व्यक्तीला रोख रक्कम भेट देणार असून, तर ती 11, 21, 51, 101 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असते. यातील 1 रुपयाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणजेच 10 ऐवजी 11 रुपये देणं हा शुभशकून मानला गेला आहे. यामागे काही विशेष कारण नाही. परंतु, एक परंपरा म्हणून याकडे पाहिलं जातं. खरं तर असं करण्यामागं एक वैचारिक (Ideological) दृष्टिकोन आहे. कारण जेव्हा तुम्ही शुभकार्यावेळी संबंधित व्यक्तीला 51 रुपये आहेर म्हणून देता, तेव्हा ती रक्कम 50 पेक्षा 1 रुपयाने अधिक असते. तसेच, तुम्ही जर 59 रुपये दिले तर ते 60 रुपये समजले जातात. यातून वाढीचा अनुभव मिळतो. यामुळे तुम्ही जी काही रक्कम दिली आहे, ती वाढ करणारी आणि जास्त आहे, असं समजलं जातं. त्यामुळे आहे त्या रकमेत 1 रुपया जास्त देण्याची पध्दत आहे. हे ही वाचा- तुम्हालाही बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचा प्रश्न असेल तर, करा हे सोपे पदार्थ कोणत्याही रकमेत शून्य आला की ती रक्कम अंतिम ठरते. तशाच प्रकारे, जर तुम्ही नातेसंबंधात (Relation) शून्याच्या आधारे नकारात्मकता दर्शवली तर ते नातं संपुष्टात येतं असं मानलं जातं. त्यामुळे आहेर म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेत 1 रुपया अधिक जोडला जातो. शून्याव्यतिरिक्त प्रत्येक अंकाचा कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी संबंध आहे. जसं की सप्तर्षी, 9 देवी, नवग्रह आदी. त्यामुळे शून्य हा शुभ ठरत नसल्याने त्यात 1 रुपयाची भर टाकली जाते. ही परंपरा कित्येक पिढ्यांपासून सुरू आहे. त्यामुळे याबाबत इतिहासात (History) डोकावणं देखील गरजेचं आहे. एका अहवालानुसार, पूर्वीच्या काळी कोणत्याही शुभकार्यात 20 आणे आहेर देण्याची परंपरा होती. याचा अर्थ 1 रुपया 25 पैसे म्हणजेच सव्वा रुपया होय. पूर्वीच्या काळी 16 आणे म्हणजे 1 रुपया होता. त्यामुळेच 50 पैसे म्हणजे आठ आणे आणि 25 पैसे म्हणजे चार आणे समजले जात. त्यामुळे पुरातन काळापासूनच एखादी गोष्ट वाढवून देण्याची परंपरा चालत आली असून, 1 रुपयावर काही पैसे दिल्यास त्याचा सव्वा रुपया होत असे. ही परंपरा आजही भारतात पाळली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.