जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्तदाब नियंत्रित करतो हा खास लसूण, तुम्हाला माहिती हवाच

कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्तदाब नियंत्रित करतो हा खास लसूण, तुम्हाला माहिती हवाच

कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्तदाब नियंत्रित करतो हा खास लसूण, तुम्हाला माहिती हवाच

हंगामी आजारांपासून दूर राहण्यासाठी सर्वात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करायला हवा, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 5 डिसेंबर : हिवाळ्यात सर्दी-तापेची समस्या खूप सामान्य असते. या हंगामात रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले लोक सर्दीला सहज बळी पडतात. या हंगामी आजारांपासून दूर राहण्यासाठी सर्वात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करायला हवा, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होईल. आज या लेखात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एका पदार्थाविषयी जाणून घेणार आहोत. याशिवाय हा पदार्थ मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी मानला जातो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काश्मीरमध्ये मिळणारा खास लसूण वापरू शकता. पर्वतांमध्ये आढळणारा हा विशेष लसूण सामान्य लसणापेक्षा आकाराने लहान असतो आणि त्याच्या कळ्याही वेगळ्या प्रकारच्या असतात. याला पहाडी लसूण आणि हिमालयन सिंगल क्लोव्ह गार्लिक असेही म्हणतात. जाणून घेऊया त्याचे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा याविषयी.

    Winter Health Tips : आरोग्याच्या प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आहेत कारले, हिवाळ्यात नक्की खा

    काश्मिरी लसणातील घटक ओनलीमायहेल्थनुसार, काश्मिरी लसणात एलिनेज एंझाइम (alliinase enzyme) मोठ्या प्रमाणात आढळते आणि ते रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय यात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. जीवनसत्त्वे आणि खनिजांबद्दल बोलायचे झाल्यास त्यात मॅंगनीज, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फॉस्फरस सारखे पोषक तत्व आढळतात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    काश्मिरी लसणाचे फायदे रोगप्रतिकारशक्ती वाढते : काश्मिरी लसूण खाऊन सर्दी, ताप, खोकला आणि संसर्गाच्या समस्येवर मात करता येते. त्याच्या दोन कळ्या चावून कोमट पाण्यासोबत प्यायल्याने तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवू शकता. खराब कोलेस्टेरॉल कमी होते : काश्मिरी लसणाच्या नियमित सेवनाने तुम्ही खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. यासाठी रोज सकाळी काश्मिरी लसणाच्या दोन कळ्या चावून खाव्यात. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या शरीरातील फरक जाणवेल. मधुमेहामध्ये फायदेशीर : काश्मिरी लसून खाल्ल्याने रोगप्रतिकाशक्ती तर मजबूत होतेच शिवाय याच्या मदतीने तुम्ही मधुमेहाची समस्या देखील नियंत्रित करू शकता. शुगर लेव्हल होते कंट्रोल : काश्मिरी लसूण खाल्ल्याने मधुमेहासोबतच रक्तदाबही नियंत्रित करता येतो. याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

    Green Peas : हिरव्या मटारचे एवढे फायदे वाचून थक्क व्हाल! शरीराच्या या समस्यांपासून देते आराम

    इन्सुलिन वाढते : काश्मिरी लसून खाऊन तुम्ही शरीरातील इन्सुलिन वाढवू शकता. काश्मिरी लसणामध्ये काही घटक असतात जे शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत करतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात