जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / डिलीव्हरीची तारीख जवळ येताच कशी झालीये करीना कपूरची अवस्था; समोर आला नवा VIDEO

डिलीव्हरीची तारीख जवळ येताच कशी झालीये करीना कपूरची अवस्था; समोर आला नवा VIDEO

डिलीव्हरीची तारीख जवळ येताच कशी झालीये करीना कपूरची अवस्था; समोर आला नवा VIDEO

काही दिवसांपूर्वीच सैफ अली खाननं (saif ali khan) आपल्याला नव्या पाहुण्याच्या आगमनाची उत्सुकता आहे, पण थोडी भीतीही वाटत असल्याचं म्हटलं होतं. आता करीना कपूरनंही (kareena kapoor) तिला नेमकं काय वाटतं आहे ते सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 फेब्रुवारी :  अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर (Anushka sharma) आता अभिनेत्री करीना कपूरही (Kareena kapoor) लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. करीनाचा नववा महिना सुरू आहे. त्यामुळे याच महिन्यात तिची प्रसूती होणार आहे. जसजशी डिलीव्हरीची तारीख जवळ येते आहे, तसतशी प्रत्येक महिलेची धाकधूक वाढते. करीना कपूरची या महिन्यात नेमकी कशी अवस्था होते आहे, ते तिनंच सांगितलं आहे. करीना कपूरनं प्रेग्नन्सीच्या नवव्या महिन्यातील आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं आपल्याला नेमकं काय वाटतं आहे, हे तिनं सांगितलं आहे.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता करीनाच्या चेहऱ्यावरचा ग्लो कायम आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची चिंता नाही. उलट ती आनंदात, उत्साही आणि बिनधास्त दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करतानाही करीनानं कॅप्शन दिलं आहे. नववा महिना आणि अधिक स्ट्राँग होते आहे. हे वाचा -   SAVE THE DATE; अखेर तो क्षण आलाच, या दिवशी आदित्य-सईचं लग्न होणार काही दिवसांपूर्वीच सैफ अली खाननं करीनाची जिलीव्हरी फेब्रुवारीत होईल असं सांगितलं होतं. तसंच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आपण दोघंही नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण दुसरं मूल ही मोठी जबाबदारी आहे. त्यासोबत थोडी भीतीही वाटते आहे, असंही तो म्हणाला होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या बाळानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या बाळाची उत्सुकता सर्वांना आहे. करीना प्रेग्नन्सीतही खूप अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरही ती आपले फोटो आणि व्हिडीओ सातत्यानं शेअर करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात