मुंबई, 03 फेब्रुवारी : माझा होशील ना (Majha Hoshil Na) ही मालिका बघता बघता प्रेक्षकांच्या गळातली ताईत झाली आहे. प्रेक्षकांना आता आदित्य (Aditya) आणि सईच्या (sai) लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. आदित्यनं नाही नाही म्हणता अखेर सईला प्रपोज केलंच आणि आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती त्यांच्या लग्नाची. काही दिवसांपूर्वीच आदित्य म्हणजे विराज कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि सई म्हणजे गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) यांच्या लग्नाचा प्रोमो दाखण्यात आला होता. सध्या सईचं सुयशशी लग्न ठरलं असून त्यांच्या लग्नाच्या विधीही सुरू झाल्या आहेत. पण मध्येच मालिकेत काही ट्विस्टही पाहायला मिळत आहे. त्यामुळे आदित्य आणि सईचं लग्न होणार हे पक्कं झालं आहे. पण कधी याचीच उत्सुकता सर्वांना आहे आणि अखेरच तो दिवस जाहीर झाला आहे.
विराजसनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सई आणि आदित्यच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. आदित्य-सईचं लग्न कधी होणार हा एकच प्रश्न विचारून विराजसच्या चाहत्यांनी आणि माझा होशीलच्या प्रेक्षकांनी त्याला भांबावून सोडलं. अखेर त्यानं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. विराजसनं एक छोटासा व्हिडीओ शेअर करत आदित्य-सईच्या लग्नाची तारीख सांगितली. हे वाचा - अमृता खानविलकरचा PHOTO पाहून श्रेया बुगडेही झाली गार; म्हणाली, ‘गरम मामला’ आदित्य आणि सईचं लग्न 14 फेब्रुवारी, 2021 ला होणार आहे. व्हेलेंटाइनच्या मुहूर्तावरच दोघं लग्न करणार आहेत. आता त्यांच्या चाहत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी हे व्हेलेंटाइन डेचं एक गिफ्टच असेल.
याआधी सई आणि आदित्यच्या लग्नाचा प्रोमो रिलीज झाला होता. ज्यामध्ये सईनं गोड असा उखाणा घेतला होता. हे वाचा - रितेश-जेनेलियाच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण; बॉलिवूडच्या क्युट कपलचे प्रेमळ PHOTOS मालिकेमध्ये सध्या आदित्यचे मामा सईच्या लग्नाआधीच्या विधीत पोहोचून लग्न थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सुयश सईशी लग्न करण्याच्या जिद्दीनं पेटला आहे आणि लग्न होण्यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करतो आहे. आता सई आणि आदित्यचं लग्न होईपर्यंत त्यांना कोणकोणत्या संकटांचा आणि परिस्थितीचा सामना करावा लागेल हेच पाहावं लागेल.