मुंबई, 7 मे - सगळ्यात झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे पोहे. फक्त भारतातच नव्हे जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने ते खाल्ले जातात. महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृतीतला हा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मराठी माणसाचा आवडता ब्रेकफास्ट. महाराष्ट्रात कांदेपोह्यांना वेगळंच स्थान आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत वेगवेगळ्या प्रकारचे कांदेपोहे मिळतात. जागतिक पोहे दिनानिमित्त जाणून घ्या झटपट कांदा पोहे तयार करण्याची रेसिपी...
महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृतीवर कितीही अतिक्रमण झालं असलं तरी, काही पदार्थांचे अस्तित्व आजही तसंच कायम आहे. कांदापोहे हा त्यापैकीच एक पदार्थ. कांदापोहे खाल्ल्याशिवाय मराठी माणसाला ब्रेकफास्ट अपूर्ण वाटतो. पोहे हे पचायला जड असल्यामुळे डॉक्टरांनी कितीही सांगितलं तरी कांदा पोह्यांची क्रेझ काही कमी झालेली नाही.
उन्हाळ्यात सगळ्यात गुणकारी ठरणारा 'हा' पदार्थ पोटाच्या समस्याही करतो दूर
असे तयार करा कांदे पोहे -
1 - कांदापोहे तयार करण्यासाठी जाड किंवा पातळ पोहे दोन्ही चालतात.
2 - जाड पोहे असतील तर आधी थोडे भिजवावे. पातळ असतील तर त्यावर हलकेशे पाणी शिपडावे.
3 - भिजवलेल्या पोह्यांमध्ये थोडी हळद आणि लिंबू पिळावे.
3 - कांदा आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यावी
4 - गॅसवर कढई ठेवल्यानंतर आधी तेल गरम करून मोहरिची फोडणी करावी.
5 - फोडणीमध्ये चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. थोडे शेंगदाणे घालावे.
6 - त्यानंतर भिजवलेले पोहे घालून त्यात चवीप्रमाणे मीठ टाकावं आणि वाफ आणावी.
7 - तयार झालेले कांदापोहे डिशमध्ये काढल्यानंतर परत त्यावर थोडं लिंबू पिळावं आणि खोबरं किस टाकावं.
8 - त्यानंतर तयार झालेले कांदापोहे सर्व्ह करावे.
केळं 'या' वेळेलाच खावं, नाहीतर होईल आरोग्याचं नुकसान
कांदे पोह्यांप्रमाणेच मटार पोहे, बटाटा पोहे, दडपे पोहे, काकडी पोहे अशा वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला तयार करता येतील. नागपुरात पोह्यात मिसळीचा रस्सा टाकून खाण्याची पध्दत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात मटार घातलेले पोहे खाण्याची पध्दत आहे.