नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 1 जुलै : गेल्या काही दिवसांपासून देशात तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. यामागे कोरोना लस असल्याचेही दावे केले जात आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात एका 2 वर्षीय बालकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. धरणगाव तालुक्यातल्या पिंप्री खुर्द गावात कार्तिक शशिकांत बडगुजर, या 2 वर्षीय बालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणात खेळताना गेला जीव पिंप्री खुर्द गावात कार्तिक शशिकांत बडगुजर हा 2 वर्षीय बालक अंगणात खेळत होता. खेळून झाल्यानंतर घरात येताच कार्तिक कोसळला. त्याला कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने कार्तिक बडगुजर या 2 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पिंप्री खुर्द गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 2 वर्षीय बालकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रोना लशीमुळे येतोय हार्ट अटॅक? गेल्या काही महिन्यांमध्ये हार्ट अटॅकची बरीच प्रकरणं समोर आली आहेत. चालता-बोलता, नाचता-गाता अचानक हार्ट अटॅक येत आहेत. अगदी तरुण तरुण मुलांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वांना चिंता वाटू लागली. दरम्यान कोरोना लसीकरणानंतर अशी प्रकरणं वाढल्याने कोरोना लशीचा आणि हार्ट अटॅकचा काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. याबाबत मोदी सरकारने आता मोठी माहिती दिली आहे. वाचा - शरीरात जास्त प्रोटीन झाल्याने होऊ शकतो मृत्यू? दिवसाला किती प्रोटीन घेणे योग्य इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने अचानक हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास केला आहे. याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. लवकरच हा अभ्यास प्रसिद्ध केला जाणार आहे. पण त्याआधी आयसीएमआरचे महासंचालक राजीव बहल यांनी मनी कंट्रोलला या अभ्यासाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती दिली आहे. अभ्यास करणार्या संशोधकांनी काही प्राथमिक निष्कर्ष शेअर केले आहेत आणि ते लवकरच सार्वजनिक केले जातील. हृदयविकाराचा झटका आणि कोविड-19 लस यांच्यातील संभाव्य दुवा याच्या अभ्यासाचे परिणाम येत्या काही आठवड्यांत बाहेर येतील. पेपरचे पीअर-रिव्ह्यू होताच, आम्ही निष्कर्ष जाहीर करू. निष्कर्षांसह शोधनिबंध इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (IJMR) ने स्वीकारला आहे आणि सध्या पेपरचे स्वतंत्र मूल्यांकन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.