मुंबई, 31 ऑगस्ट : साडीत (saree) मला चालणंही शक्य होत नाही. असं कित्येक महिलांच्या तोंडून ऐकलं असेल. खरंच बहुतेक महिलांना साडी नेसून साधं चालणं, उठणं बसणंही कठीण वाटतं. अशात तुम्हाला कुणी साडी नेसून एखादा स्टंट मारायला सांगितला तर, तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही. मात्र आपल्याला अशक्य आणि कठीण वाटणारी ही गोष्ट साध्य करून दाखवली आहे एका महिलेने. एका महिलेने साडी नेसून परफेक्ट फ्लिप मारून दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहूनही तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
निळ्या रंगाची साडी नेसलेली ही महिला आणि तिच्यासह एक ग्रे कलरचा सूट घालून तरुणही आहे. या महिलेचं नाव पारुल अरोरा तर पुरुषाचं नाव मायकेल होशियार सिंग असल्याचं सांगितलं जातं आहे. दोघंही एकत्र फ्लिम मारतात आणि नंतर स्टाइलमध्ये चालतात. हे वाचा - …आणि महिलेच्या शरीरात शिरला 4 फूट लांब साप, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO यावर ‘wow’, ‘splendid’ and ‘superb’ अशाच प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. अनेकांनी फायर, क्लॅपिंग, थम्ब्स अप इमोजी टाकले आहेत. अनेकांनी तिच्याकडून टीप्सही मागितल्या आहेत. काही महिलांनीदेखील आपल्याला साधं चालणंही शक्य होत नाही, असं म्हणतच महिलेला दाद दिली आहे.