मुंबई, 12 मार्च: मासिक पाळी (Menstruation) हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. या चार दिवसांत स्त्रीयांना अनेक वेदनांना सामोरं जावं लागतं. मासिक पाळीच्या काळात महिलांना मळमळ, अपचन, पाठदुखी, मांड्या दुखणं, डोकेदुखी, छाती जड होणं असे त्रास होतात. काही स्त्रियांना प्रचंड थकवा येतो. काही महिला मासिक पाळीतदेखील हलका व्यायाम किंवा जाॉगिंग करतात. तर काही महिला मासिक पाळीचे चार दिवस फक्त झोपून राहतात. मासिक पाळीत धावणं किंवा व्यायाम करणं योग्य आहे की नाही, या संदर्भात त्यांच्यात संभ्रम असतो. तर आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या त्या चार दिवसांमध्ये व्यायाम करणं किंवा जॉगिंग करणं (Running Benefits during periods) किती सुरक्षित आहे तसंच त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे सांगणार आहोत. मासिक पाळीचे दिवस काही स्त्रियांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास (Periods Pain) महिलांसाठी एक गंभीर (Periods Health Issue) समस्या आहे. मासिक पाळी आल्यानंतर महिला किंवा किशोरवयीन मुली त्रास झाल्यानंतर बेडवर पडून राहतात. त्रासामुळे त्यांना काही खावसं वाटत नाही. तसंच सतत मूड स्विंग्ज होत असतात. हे वाचा- लग्नानंतर पुरुष वा महिलांनाही येऊ शकतं डिप्रेशन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय मासिक पाळीदरम्यान चालणं किंवा धावणं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. इंडियन एक्सप्रेसमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्यासाठी धावणं आणि चालणं फार फायदेशीर असतं. दिवसात 30 मिनिटं धावल्यानंतर हृदयाशी संबंधित समस्या टाळल्या जाऊ शकतात. तुम्ही मासिक पाळीत चालण्यासारखे हलके व्यायाम करू शकता. मासिक पाळी आल्यानंतर शरीरातील इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे अधिक सुस्त वाटतं. तसंच छातीत जळजळ जाणवते. अशा परिस्थितीत, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये, तुम्ही संथ गतीने धावण्याचा व्यायाम करू शकता. पण, सलग धावत राहू नये, थोडं धावल्यानंतर थांबून पाणी प्यावं. मासिक पाळीत धावण्याने ओटीपोटात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. हे वाचा- रात्री झोपेत तुमचंही तोंड कोरडं पडतं का? या गोष्टी वेळेवर करायला विसरू नका शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मन आनंदी राहण्यासाठी योग (Yoga) करणं अत्यंत गरजेचं आहे. मासिक पाळीत योग केल्याने तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकता. यामुळे चिंता, निराशा, तणाव, अस्वस्थता, अशक्तपणा यासारख्या समस्या दूर होतात. मासिक पाळीदरम्यान पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम, स्ट्रेचिंग करणं फायदेशीर ठरतं. मासिक पाळीच्या दिवसांत व्यायाम करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी खूप वेगाने धावू नका. तसंच धावताना मध्येच थांबून पाणी प्या. त्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. तसंच जर तुम्हाला ओटीपोटात किंवा पाठदुखीचा त्रास होत असेल तर धावू नका फक्त चालण्याचा व्यायामदेखील पुरेसा आहे. याशिवाय, जेवण केल्यानंतर ताबडतोब धावायला जाऊ नका. जेवणाच्या 30 मिनिटानंतर फिरायला जावं. मासिक पाळीच्या दिवसांत या गोष्टींची काळजी घेतल्यास वेदनांपासून सुटका मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.