मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

खरं की खोटं? मोदी सरकार देशातील सर्व विद्यार्थ्यांना देतंय मोफत लॅपटॉप

खरं की खोटं? मोदी सरकार देशातील सर्व विद्यार्थ्यांना देतंय मोफत लॅपटॉप

मोदी सरकारमार्फत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप (laptop) मिळतोय असा whatsapp मेसेज तुम्हालाही आला आहे का?

मोदी सरकारमार्फत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप (laptop) मिळतोय असा whatsapp मेसेज तुम्हालाही आला आहे का?

मोदी सरकारमार्फत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप (laptop) मिळतोय असा whatsapp मेसेज तुम्हालाही आला आहे का?

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 30  नोव्हेंबर : सध्या कोरोनाच्या साथीमुळे लोक घरातूनच काम करत आहेत. याचबरोबर देशभरातल्या शाळांमधील विद्यार्थीही ऑनलाइन अभ्यास करत आहेत. ऑनलाईन शिक्षणाची गरज लक्षात घेऊन सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटत आहे, अशा आशयाचा व्हॉट्सअॅप मेसेज सध्या व्हायरल होतो आहे.  व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जेणेकरून ज्यांना लॅपटॉपची गरज आहे, त्यांना तो मिळू शकेल आणि आपल्या देशातील साक्षरतेत वाढ होईल.

तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर सावध व्हा. अशा मेसेजच्या कोणत्याही लिंकवर किंवा संकेतस्थळावर कोणतीही व्यक्तिगत माहिती देऊ नका. केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही किंवा हा मेसेजही सरकारमार्फत पाठवलेला नाही. हा मेसेज तुम्हाला पाठवला आहे, सायबर गुन्हेगारांनी. या मेसेजबरोबर एक लिंकही देण्यात आली असून ती लिंक ओपन करून आपली माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे तुम्ही सायबर फ्रॉडचे शिकार व्हाल.

सायबर फ्रॉड करणारे लोक रोज नवनवीन क्लृप्त्या शोधत आहेत आणि लोकांना बळीचा बकरा बनवत आहेत. सायबर फ्रॉड करणाऱ्या लोकांकडून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी सरकार मोफत लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट देत असल्याचा हा मेसेज आहे. मात्र हा मेसेज खोटा असून केंद्र सरकारनं अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही.

हे वाचा -  Aadhaar card मध्ये बदल करण्यासाठी कुणी पैशांची मागणी केल्यास इथं करा तक्रार

भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची सत्यता पडताळली तेव्हा हा मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची सत्यता पडताळली तेव्हा हा मेसेज बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने अशाप्रकारे ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट देण्याची घोषणा केलेली नाही. पीआयबी फॅक्ट चेकवर सरकारने लोकांना आवाहन केले आहे की, अशा खोट्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. यात देण्यात आलेल्या लिंकवर कोणतीही माहिती देऊ नका.

First published:

Tags: Cyber crime, PIB, Viral news