नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : आधार कार्ड (Aadhaar card) हा एक महत्त्वाचा शासकीय दस्तावेज आहे. कोणत्याही प्रकारच्या सरकारी कामांसाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे. अनेकदा आधार कार्ड काढताना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती चुकीची भरली गेल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच आधार केंद्रावरील संबंधित व्यक्ती माहिती दुरुस्तीसाठी अनेकदा नियमबाह्य रकमेची मागणी करते. मात्र याविरोधात संबंधित नागरिकास तक्रार दाखल करता येते.
आधारवरील माहिती दुरुस्त करण्यासाठीचे नियम जाणून घेणं आवश्यक आहे.
आधारवरील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठीची फी
आधार कार्डावर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक चुकीचा नोंदला गेला तर त्यात सुधारणा करता येते. यासाठी 50 रुपये फी आकारली जाते. यासाठी नागरिकांना जवळील आधार केंद्रावर जाऊन एक फार्म भरावा लागेल. त्यानंतर 24 ते 48 तासांत तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.
मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट निशु:ल्क
यूआयडीएआयच्या नियमांनुसार 5 ते 15 वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट निशु:ल्क केलं जातं. वय वर्षे 15 वरील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी 50 रुपये फी आकारली जाती.
आधारच्या कलर प्रिंटसाठी शुल्क
आधार केंद्रावर आधार कार्डाची कलर प्रिंट काढण्यासाठी 30 रुपये फी आकारली जाते.
ज्यादा फी शुल्क आकारल्यास येथे करा तक्रार
जर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ज्यादा फी संबंधित व्यक्तीने मागितल्यास 197 या टोल फ्री क्रमांकावर त्या व्यक्तीची तक्रार करता येते. तसंच help@uidai@gov.in या मेल आयडीवर देखील तक्रार नोंदवता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money