Home » photogallery » lifestyle » IN MAHARASHTRA 5 DISTRICT CORONA ACTIVE CASES MORE THAN KERLA WHICH IS THE SECOND MOST CORONA AFFECTED STATE IN INDIA UP MHPL
महाराष्ट्रात कोरोनाचं भयंकर रूप! सर्वाधिक Active cases असलेल्या दुसऱ्या राज्यापेक्षाही जास्त रुग्ण 5 शहरात
देशात सर्वात जास्त कोरोना रुग्ण (Coronavirus in India) असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र (Coronavirus in Maharashtra) आणि त्यानंतर केरळचा क्रमांक लागतो.
|
1/ 7
देशातील कोरोना रुग्णांच्या बाबतीत सर्वाधिक रुग्ण आहेत ते महाराष्ट्रात आणि त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो केरळचा.
2/ 7
दोन्ही राज्यांतील अॅक्टिव कोरोना रुग्णांची संख्या अनुक्रमे 3 लाख आणि 24 हजार आहेत.
3/ 7
महाराष्ट्राची परिस्थिती तर इतकी गंभीर आहे की देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या दुसऱ्या क्रमांकांच्या राज्यापेक्षाही जास्त अॅक्टिव्ह केसेस हे महाराष्ट्रातीलच 5 शहरांमध्ये आहेत.
4/ 7
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये देशातील सर्वाधिक अॅक्टिव कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.
5/ 7
राज्याच्या आरोग्य विभागाने 30 मार्च रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त रुग्ण आहेत ते मुंबई, पुण्यात. या दोन्ही शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 45 हजार पार आहे. मुंबईत 47442, तर पुण्यात तब्बल 57694 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
6/ 7
यानंतर नागपूर, ठाणे आणि नाशकात अनुक्रमे 45303, 37512, 28979 अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.
7/ 7
राज्यातील मृत्यूचा आकडाही भयावह आहे. गेले काही दिवस दररोज 100 पेक्षा जास्त कोरोना बळी जात आहेत. गेल्या 24 तासांत तब्बल 139 मृत्यूची नोंद झाली आहे.