जाहिरात
मराठी बातम्या / देश / सर्वांसमोर येणार Corona चा खरा चेहरा, महाभयंकर व्हायरसने तिसरा टप्पा तर गाठला नाही ना? उद्या समजणार

सर्वांसमोर येणार Corona चा खरा चेहरा, महाभयंकर व्हायरसने तिसरा टप्पा तर गाठला नाही ना? उद्या समजणार

सर्वांसमोर येणार Corona चा खरा चेहरा, महाभयंकर व्हायरसने तिसरा टप्पा तर गाठला नाही ना? उद्या समजणार

कोरोनाव्हायरस (Coronavirus) आता कोणत्या टप्प्यात (stages) आहे, याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) निकाल देणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली,23 मार्च : भारतासाठी (India) उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोनाव्हायरस (Coronavirus) दुसऱ्या टप्प्यातून (second stage) तिसऱ्या टप्प्यात (third stage) तर पोहोचला नाही ना? याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) निकाल देणार आहे. ICMR चे डॉ. आर. आर. गंगाखेडकर यांनी मॅथेमेटिकल मॉडेलवर काम सुरू असून, मंगळवारी त्याचा निकाल येईल असं सांगितलं आहे. भारतात पुणे आणि तामिळनाडून कोरोनाव्हायरसचे असे रुग्ण आहेत, ज्यांना कोरोनाव्हायरसची लागण नेमकी कशी आणि कुठून झाली ते समजलेलं नाही. आतापर्यंत कोरोनाव्हायरस प्रभावित देशांमधून भारतात आलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. याचा अर्थ भारत कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. मात्र पुणे आणि तामिळनाडूतील रुग्णांच्या व्हायरसचा स्रोतच सापडला नाही, त्यामुळे कोरोनाव्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचला की काय अशी भीती निर्माण झाली आहे. हे वाचा -  सावधान! स्टेज 3 चा Coronavirus आहे महाभयानक, तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी होईल अवस्था डॉक्टर गंगाखेडकर यांच्या मते, आतापर्यंत देशात जितक्या कोरोनाग्रस्तांची चाचणी करण्यात आली, त्यांच्यामध्ये सौम्य गटातील आहेत. त्यामुळे या रुग्णांमध्ये साधा ताप आणि सर्दी अशीच लक्षणं दिसली. सौम्य कॅटेगरीतील कोरोनाव्हायरसचा तितका धोका नाही. ताप, अंगदुखी, सुका खोकला अशा सामान्य लक्षणांवर उपचार करूनही माइल्ड कोरोनाव्हायरस बरा होतो. ICMR च्या सूत्रांनुसार, देशातील विविध भागातील जवळपास 1000 सॅम्पल घेतलेत, त्यावरून देशात आतापर्यंत कोरोनाव्हायरस दुसऱ्या टप्प्यात आहे, हे समजलं. ज्या व्यक्तींचे नमुने घेण्यात आलेत, त्या व्यक्ती परदेशात गेल्या नव्हत्या, किंवा परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नव्हत्या. या सॅम्पलच्या आधारेच आतापर्यंत कोरोनाव्हायरसने भारतात रौद्र रूप धारण केलेलं नाही, असं सांगितलं जात होतं. मात्र अजूनही काही गोष्टींवर अभ्यास सुरू आहे, ज्याचा निकाल उद्या स्पष्टपणे लागेल. हे वाचा -  कोरोनाव्हायरसपेक्षाही दरवर्षी कित्येक लोकांचा जीव घेतात ‘हे’ आजार जगभरात कोरोनाव्हायरसने 3 लाखपेक्षा जास्त लोकांचा विळख्यात घेतलं आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे 428 रुग्ण आहेत. जगभरात कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्या जवळपसा 15 हजारांवर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत असली, तरी भारत अद्याप कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात आहे, असा दिलासा होता. मात्र आता कोरोनाव्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्यामुळे धाकधूक वाढली आहे. हे वाचा -  ‘आता पोट भरण्यापेक्षा शहर वाचवणं महत्त्वाचं’; कोरोनाशी लढण्यासाठी ऑटो घेऊन सुसाट निघाला ड्रायव्हर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात