Home /News /lifestyle /

उपवासामुळे महिलांच्या आरोग्यावर, Periods वर परिणाम होतो? जाणून घ्या काय आहे एक्सपर्ट्सचं म्हणणं

उपवासामुळे महिलांच्या आरोग्यावर, Periods वर परिणाम होतो? जाणून घ्या काय आहे एक्सपर्ट्सचं म्हणणं

दिवसभर उपवास ठेवल्यास शरीरामध्ये रक्ताची कमतरता (Anemia) होऊन पीरियड्सवर (Periods) परिणाम होऊ शकतो, अशी भीती असते. या महिलांना असलेल्या भीतीमध्ये कितपत तथ्य आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 9 एप्रिल : कुटुंबव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी सर्वांत मोठी जबाबदारी स्त्रिया पार पाडतात. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अगदी लहानात लहान गोष्टींचीही काळजी स्त्रिया घेतात. याशिवाय, नातेवाईक-पाहुण्यांचा पाहुणचार, सण-समारंभ, उपवास (Fast) या सर्व गोष्टी सुरळीत पार पाडण्यासाठी स्त्रिया खूप कष्ट घेतात. या सर्व गोंधळात त्यांचं स्वत:च्या आरोग्याकडे (Women Health) दुर्लक्ष होतं. सातत्यानं उपवास केल्याचासुद्धा महिलांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. सध्या तर आपल्या देशातल्या अनेक स्त्रिया उपवास करत असतील. सध्या हिंदूंचा चैत्र नवरात्र (Chaitra Navratri) हा उत्सव आणि मुस्लिमांचे रमजान रोजे (Ramadan Roza) सुरू आहेत. त्यामुळे आपापल्या आराध्य देवतांची उपासना करण्यासाठी अनेक महिला दिवसभर उपवास करत आहेत. त्यात उन्हाळाही (Summer) सुरू असल्यानं दिवसभर अन्न-पाण्याविना राहणं जास्त कठीण ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही महिलांनी उपवास करणंच टाळलं आहे. दिवसभर उपवास ठेवल्यास शरीरामध्ये रक्ताची कमतरता (Anemia) होऊन पीरियड्सवर (Periods) परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांना आहे. या महिलांना असलेल्या भीतीमध्ये कितपत तथ्य आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. 'हर जिंदगी डॉट कॉम'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. उपवासादरम्यान मासिक पाळी येण्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतात का? याबाबत डॉ. गुलबहार अन्सारी (B.U.M.S) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की उपवासाचा महिलांच्या पीरियड्सवर कोणताही परिणाम होत नाही. उपवास (Fasting) म्हणजे अन्न-पाण्याविना राहणं एवढाच अर्थ नव्हे. आपल्या सर्व वाईट सवयी (Bad Habits) नियंत्रित करण्याचा तो एक मार्ग समजला जातो. उपवासाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. उपवासाच्या वेळी कोणत्याही प्रकारचे बॅड फॅट्स (साखर, फास्ट फूड) आपल्या शरीरात जात नाही. त्यामुळे आपल्या शरीरातल्या बॅड सेल्स (Bad Cells) उपासमारीमुळे आपोआप नष्ट होतात. परंतु, उपवास किंवा रोजे सोडल्यानंतर महिलांचा आहार किंवा जीवनशैलीचा त्यांच्या पीरियड्सवर नकारात्मक परिणाम (Negative Effects) होऊ शकतो. उदाहरणार्थ, इफ्तारीच्या वेळी किंवा उपवास सोडल्यानंतर जास्त तळलेले पदार्थ खाणं, अधिक थंड गोष्टींचं सेवन करणं, या गोष्टी महिलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. म्हणूनच उपवासाच्या वेळी आणि त्यानंतरही हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. उपवास किंवा रोजे ठेवल्यामुळे शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासू शकते, असा काही महिलांचा समज आहे. काही प्रमाणात हे खरंदेखील आहे. दीर्घ काळ शरीरात योग्य पोषक घटक गेले नाहीत तर रक्ताची कमतरता निर्माण होणं, हे साहजिक आहे. उपवासामुळे रक्ताची कमतरता भासू नये यासाठी नियमितपणे खजूर (Dates) खाल्ले पाहिजेत. खजुरांचे अनेक आरोग्यदायी फायदे तर आहेतच, शिवाय ते शरीरातलं रक्त वाढवण्याचंही काम करतात. डॉ. गुलबहार अन्सारींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, खजूर हा विविध व्हिटॅमिन्स, मिनरल्स, एनर्जी, शुगर आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. याशिवाय खजूरामधून तुम्हाला कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि मँगनीजदेखील मिळेल.

हे वाचा - तुम्ही साखरेचा चेहऱ्यासाठी असा कधी वापर केला नसेल; Skin care products फिके पडतील

उपवास सुरू असताना आपल्या पीरियड्सवर नकारात्मक परिणाम होऊ नये, असं महिलांना वाटत असेल तर त्यांनी आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. हेल्दी फूड (Healthy Food) खाण्यासोबतच आणि चांगली लाइफस्टाइल (Lifestyle) फॉलो केली पाहिजे. महिलांनी उपवासाला खजूर खावेत आणि त्यानंतर इतर फळं खावीत. यानंतर साधं पाणी पिऊ शकता. जास्त थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे. यानंतर, एक ते दोन तासांचा ब्रेक घ्यावा आणि नंतर जेवू शकता. जेवणामध्ये भाज्या, मसूर, चपाती आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश करता येऊ शकतो. उपवासानंतर एकाच वेळी भरपूर जेवणं टाळलं पाहिजे. कारण त्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते. रोजे किंवा उपवास करताना काय खाल्लं पाहिजे यासोबतच काय खाता कामा नये यालादेखील महत्त्व आहे. अनेक जण उपवासात तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खात असल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा पदार्थांमध्ये फास्ट फूड (Fast Food), भजी यांचा समावेश असतो. हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्लास आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. यामुळे महिलांचं वजन वाढून पीरियड्सच्या सायकलवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की जेव्हा महिलांचं वजन वाढतं तेव्हा त्यांना PCOS समस्येचा सामना करावा लागतो. याला मेटाबॉलिक सिंड्रोम (Metabolic Syndrome) असंदेखील म्हणतात. त्यामध्ये हॉर्मोन्स असंतुलित होतात आणि पीरियड्सच्या विविध समस्या सुरू होतात. त्यामुळे महिलांनी उपवासाच्या काळात थंड आणि जास्त तळलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उपवासादरम्यान, खाण्या-पिण्याची व्यवस्थित काळजी घेतली तर पीरियड्सच्या सायकलवर (Periods Cycle) विशेष परिणाम होत नाही.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Periods, Women

पुढील बातम्या