हा आपल्या राज्यातला काय देशातलाही रस्ता नाहीये. हा आहे इटलीतला एक चौक आणि तिथे नउवारी नेसून या स्त्रिया योगासनं करतायत आणि तमाम इटालीयन जनतेला शिकवतायत.. पाहा काय आहे ही International Yoga Day ची स्टोरी..
दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. यंदा देखील या दिवसाच्या निमित्ताने जगभरात अतिशय उत्साह आहे. या योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर इटलीमध्ये सामूहिक योगाभ्यास करण्यात आला.
मूळचे नागपूरचे असलेले इटलीतले प्रसिद्ध योग गुरु माही गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा योग दिवस साजरा करण्यात आला.