जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / International Men’s Day 2022: आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन; भारतात थोडा उशीराच साजरा केला जाऊ लागला

International Men’s Day 2022: आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन; भारतात थोडा उशीराच साजरा केला जाऊ लागला

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

International Men’s Day 2022- या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिन देखील लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास आणि हेतू जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : ‘महिला दिना’प्रमाणेच ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ देखील साजरा केला जातो. दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा होतो. समाज आणि कुटुंबामध्ये पुरुषांचे असलेल्या महत्त्व आणि योगदानाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. समाजात पुरुषांच्या कल्याणासाठी आणि आरोग्याबाबत जागरुकता आणणे हा देखील या दिवसाचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा सहा स्तंभांवर आधारित आहे, हे सहा स्तंभ समाजातील पुरुषांची सकारात्मक प्रतिमा प्रतिबिंबित करतात. हा दिवस समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि पर्यावरणात पुरुषांचे योगदान साजरे करण्यावर भर देतात. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिन देखील लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास आणि हेतू जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास 1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तेलकसिंग यांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करताना आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पहिल्यांदा साजरा केला. या दिवशी त्यांनी पुरुषांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले. 19 नोव्हेंबर 2007 रोजी भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला. हे वाचा -  दातात झालं असं खतरनाक इन्फेक्शन की जीवही गेला; 15 वर्षीय मुलीचा मृत्यू आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व - आंतरराष्‍ट्रीय पुरूष दिन साजरा करण्‍याचा मुख्‍य उद्देश हा समाजाला पुरूषांचे तंदुरुस्ती आणि आरोग्य, त्यांचे संघर्ष आणि पुरूष वर्षानुवर्षे सामोरे जात असलेल्या सामाजिक परिस्थितीची माहिती देण्‍याचा आहे. या दिवशी पुरुषांवरील भेदभावाबद्दल देखील बोलले जाते आणि चांगले लैंगिक संबंध निर्माण करण्याचे आश्वासन दिले जाते. पुरुषांचीही समाजात आणि कुटुंबात वेगळी ओळख असते. त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात