दिल्ली, 29 जानेवारी : तब्बल 8 लाख भारतीयांचे विवाहबाह्य संबंध (Extra-marital relation) आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर येते आहे. ग्लीडन Gleeden या फ्रान्समधील Extra-marital dating app वर भारतीयांनी नोंदणी केली आहे. याबाबत ग्लीडनने सर्वेक्षण केलं आहे.
Gleeden (ग्लिडेन) हे विवाहबाह्य संबंधांसाठी जगातील पहिलं डेटिंग अॅप आहे. हे अॅप 2009 मध्ये फ्रान्समध्ये लॉन्च झालं आणि भारतात 2017 साली आलं. ग्लीडन डॉट कॉम महिलांचा एक ग्रुप चालवतं. महिलांसाठी हे अॅप पूर्णपणे मोफत आहे, तर पुरुषांना काही पैसे आकारले जातात.
हेदेखील वाचा - Live-in relationship मध्ये राहण्याचा विचार, Side effects जरूर वाचा
Gadgets Now च्या रिपोर्टनुसार Gleeden अॅपचा ग्रोथ रेट 567 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जो या डेटिंग अॅपची वाढती लोकप्रियता दर्शवतो. जानेवारीच्या सुरुवातीला या अॅपवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेष म्हणजे फक्त पुरुषच नाही तर महिलांचाही या अॅपकडे कल वाढला आहे.
नोव्हेंबर 2019 मध्ये बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, पुणे, नवी दिल्ली, हैदराबाद, गुरुग्राम, नोएडा, विशाखापट्टनम, नागपूर, सूरत, इंदूर आणि भुवनेश्वर या शहरातील पुरुषांनी सर्वाधिक नोंदणी केली आहे.
गेल्या वर्षी या अॅपवर 25 टक्के महिला युजर्स होत्या, यावर्षी महिला युजर्सची संख्या 35 टक्के झाली आहे. बंगळुरू, मुंबई, दिल्ली, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्नई, गुरगाव, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, कोची, नोएडा, लखनऊ, इंदूर, सूरत, गुवाहाटी, नागपूर आणि भोपाळ याठिकाणच्या सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.
विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या भारतीयांमध्ये बंगळुरूतील संख्या सर्वाधिक आहे. मात्र महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूरही मागे नाही. आपल्या विवाहित जीवनात नाखूश असलेली लोकं फ्रान्सच्या या ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. विवाहबाह्य संबंध ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी हे जगातील सर्वात मोठं असं व्यासपीठ बनलं आहे.
हेदेखील वाचा - स्त्रियांनी SEX नंतर चुकूनही करू नयेत 'या' 5 गोष्टी मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.