मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

इथेही लेडिज फर्स्ट! जगभरातील स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त रागीट; काय सांगतोय परीक्षण अहवाल एकदा वाचाच

इथेही लेडिज फर्स्ट! जगभरातील स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त रागीट; काय सांगतोय परीक्षण अहवाल एकदा वाचाच

जगभरातील स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त रागीट

जगभरातील स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त रागीट

भारतातली परिस्थिती पाहता, स्त्रियांना इतका राग का येतो किंवा त्यांची चिडचिड का होते, याचं कारण सामाजिक परिस्थितीमध्ये दडलेलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 डिसेंबर :    स्त्रिया आणि पुरुष यांच्यात कायम श्रेष्ठत्वाची चढाओढ असते. तसं पाहिलं अनेक बाबतीत दोन्ही घटकांमध्ये असमानता आहे; मात्र जवळपास सर्वच गोष्टीत कोण कोणापेक्षा सरस ठरतो अशी स्पर्धा सुरू असते. सौंदर्य, माया, प्रेमळपणा आदींबाबत स्त्रिया कायमच आघाडीवर राहिल्या आहेत; मात्र आता रागीटपणाच्या बाबतीतही त्यांनी पहिला नंबर घेतलाय. गॅलप वर्ल्ड पोलच्या सर्वेक्षणानुसार जगभरातल्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया रागीट असण्याचं प्रमाण 6 टक्के जास्त आहेत. भारतात तर हे प्रमाण दुप्पट आहे. म्हणजेच भारतातल्या स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत रागीट असण्याचं प्रमाण 12 टक्के जास्त आहे.

गेल्या दशकात लोकांची सामाजिक, भावनिक, आर्थिक परिस्थिती बदलली. मानसिक ताण वाढला. स्त्रियांमध्ये तर हा ताण जास्तच वाढला. त्यामुळेच महिलांमधला चिडचिडेपणा, रागही वाढला. गॅलप वर्ल्ड पोलनं 2012 ते 2021 या 10 वर्षांत 150 देशांमधल्या 12 लाख जणांचं सर्वेक्षण केलं. 10 वर्षांपूर्वी स्त्रिया व पुरुषांमधला ताण आणि रागाची पातळी समान होती; मात्र आता महिलांमधला रागीटपणा वाढला आहे, असं त्यात दिसून आलं. जगभरात पुरुषांपेक्षा महिलांमधला रागीटपणा 6 टक्के जास्त आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये ही आकडेवारी 12 टक्के आहे. भारतात पुरुषांमधल्या रागीटपणाची पातळी 27.8 टक्के आहे, तर स्त्रियांमध्ये ती 40.6 टक्के आहे. कोरोना महामारीनंतर त्यात वाढ झाली आहे.

हेही वाचा - मासिक पाळीदरम्यान होणारा ब्लोटिंगचा त्रास कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ करतील मदत

भारतातली परिस्थिती पाहता, स्त्रियांना इतका राग का येतो किंवा त्यांची चिडचिड का होते, याचं कारण सामाजिक परिस्थितीमध्ये दडलेलं आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. लक्ष्मी विजय कुमार यांनी ते स्पष्ट केलं. त्यांच्या मते, सगळ्या देशांमध्ये महिला आधीपेक्षा जास्त शिक्षित झाल्या, नोकरी करू लागल्या. त्यामुळे त्या आत्मनिर्भर झाल्या. भारतात अद्याप पितृसत्ताक व्यवस्था आहे. त्यामुळे घराघरात स्त्रियांचं स्थान मजबूत नाही; मात्र बाहेर स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी केल्या जातात. या असमतोलामुळे आता स्त्रिया आवाज उठवायला लागल्या आहेत. त्या भावना व्यक्त करू लागल्या आहेत. आधीच्या काळात स्त्रियांनी राग व्यक्त करणं हेच चुकीचं मानलं जात होतं. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे स्त्रिया राग व्यक्त करतात. त्यांची चिडचिड व खदखद बोलून दाखवतात.

स्त्रियांच्या रागाबाबत ‘रेज बिकम्स हर’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अमेरिकन लेखिका सोराया शेमली यांनीही महिलांच्या रागाबाबत कारण सांगितलं आहे. त्या सांगतात, आरोग्य क्षेत्रासारख्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा सहभाग अधिक आहे. कामाच्या तुलनेत त्याचा मोबदला त्यांना मिळत नाही. त्यांच्याकडून अधिक कामाच्या अपेक्षा असतात. घरातही तीच अपेक्षा असते. त्यामुळे स्त्रियांमधला राग, चिडचिड वाढते.

समाजातली आताची परिस्थिती बदलते आहे. स्त्रियांचा आवाज दडपला जात नाही. त्यामुळे अधिकाधिक स्त्रिया आता व्यक्त होतात. त्याचाच परिणाम ही आकडेवारी दाखवते. आपलं बोलणं आधीपेक्षा जास्त विचारात घेतलं जातं, असं 40 टक्के स्त्रियांना आता वाटतं. निम्म्याहून अधिक स्त्रिया आता स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेतात. अमेरिका आणि पाकिस्तान वगळता जगभरातल्या निम्म्या महिला जोडीदारासोबत मोकळेपणानं रोमान्स करतात. अमेरिका आणि यूके सोडून जगभरातल्या दोन तृतीयांश स्त्रिया डिजिटल मीडियामुळे व्यक्त होऊ लागल्या आहेत.

भारतात तर गेल्या काही वर्षांत सामाजिक परिस्थिती वेगानं बदलते आहे. स्त्रियांवरचा अन्याय व भेदभाव यांच्याबाबत त्या व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यातच मानसिक ताण वाढतोय. हेही स्त्रियांच्या रागाचं एक मोठं कारण आहे.

First published:

Tags: Stress, Women