Home /News /lifestyle /

साधा भात शिजवतानाच गोऱ्यांना फुटला घाम; ब्रिटिश म्हणतात, 'Indian food बनवणं सोपं नाही बाबा!'

साधा भात शिजवतानाच गोऱ्यांना फुटला घाम; ब्रिटिश म्हणतात, 'Indian food बनवणं सोपं नाही बाबा!'

ब्रिटिशांच्या मते, सर्वांत कठीण असलेल्या रेसिपीजच्या यादीत भारतीय पदार्थांचा नंबर पहिला आहे.

ब्रिटन, 15 जुलै: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभर लॉकडाऊन लागू करावं लागलं. त्यामुळे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर बंधनं आली. लॉकडाउनमुळे घरातच अडकलेल्या लोकांनी घरीच वेगवेगळ्या डिशेस (Dishes) ट्राय करायला सुरुवात केली. भारतीयांनी (Indian Cuisine) वेगवेगळ्या भारतीय खाद्यपदार्थांच्या रेसिपीज (Recipes) घरी करून त्यांचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर केले. ब्रिटनमधल्या (UK) लोकांनीही असे प्रयत्न केले. निदान डाळ-भात तरी आपल्याला घरी तयार करता यायला हवा; मात्र तेही त्यांच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. लॉकडाऊनमध्ये आपल्या घरी स्वयंपाकाचं (Cooking Skill) कौशल्य आजमावून पाहणाऱ्या सुमारे 2000 ब्रिटिशांना (British) एका अभ्यासात समाविष्ट करण्यात आलं होतं. या ब्रिटिश नागरिकांनी असं सांगितलं, की त्यांनी लॉकडाउनमध्ये चायनीज, इटालियन, मेक्सिकन आणि भारतीय खाद्यपदार्थ घरी बनवून पाहण्याचा प्रयत्न केला होता. त्या सर्वांत जास्त मेहनत ज्या पदार्थांसाठी करावी लागली, ते पदार्थ भारतीय होते, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं होतं. हे वाचा - तुम्ही चहा बनवताना या चुका करताय का? ही आहे Perfect Tea बनवण्याची योग्य पद्धत 2000 पैकी 39 टक्के नागरिकांनी आपल्या घरी भारतीय खाद्यपदार्थ तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या सर्वांचं असं म्हणणं होतं, की भारतीय खाद्यपदार्थ (Indian Cuisine) तयार करणं सर्वांत कठीण आहे. त्यासाठीच्या मसाल्यांपासून (Spices) हे पदार्थ तयार करण्याच्या पद्धतीपर्यंत सगळ्या प्रकारांनीच त्यांचा अक्षरशः घाम काढला. तयार करण्यासाठी सर्वांत कठीण असलेल्या रेसिपीजच्या यादीत भारतीय पदार्थांचा नंबर सर्वांत पहिला लागला. भारतीय खाद्यपदार्थांनंतर चायनीज (Chinese) आणि इटालियन (Italian) पदार्थांचा नंबर लागतो. हे पदार्थ तयार करण्यासाठी भारतीय पदार्थांच्या खालोखाल मेहनत करावी लागते. या यादीत ब्रिटिश व्यक्तींनी इंग्लंडमधल्या खाद्यपदार्थांचाही पाचवा क्रमांक लावला. इंग्लिश खाद्यपदार्थांपेक्षा स्पॅनिश, थाई, ग्रीक खाद्यपदार्थ तयार करणं सोपं असतं, असं त्यांचं मत पडलं. ब्रिटिशांना सर्वात अवघड वाटणारा भारतीय पदार्थ बिर्याणी ब्रिटिशांना तयार करण्यासाठी सर्वांत अवघड वाटलेला भारतीय पदार्थ म्हणजे बिर्याणी (Biryani). चिकन बिर्याणी असो, एग फ्राइड राइस असो किंवा व्हेज बिर्याणी असो, त्या सगळ्यासाठी तांदूळ शिजवावे लागतातच. तांदूळ शिजवून चांगला भात (Cooking Rice) तयार करणं हेच काम ब्रिटिशांना खूप कठीण वाटलं. 22 टक्के लोकांनी असं सांगितलं, की त्यांना सुरुवातीला हे सोपं वाटलं. पण नंतर ते खूप कठीण होऊन बसलं. 26 टक्के लोकांनी शिजवलेला भात चिकट झाला, तर 34 टक्के लोकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त भात शिजवला. हे वाचा - OMG! शिजवायला गेली अंडं पोळून निघाला चेहरा; ऑनलाईन रेसिपी फंडा पडला महागात हे संशोधन केलं होतं Anna Beheshti यांनी. 'कोरोनाच्या कारणामुळे का असेना, पण ब्रिटनमधल्या लोकांनी स्वयंपाकघरात काही वेळ व्यतीत केला आणि खाद्यपदार्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले,' असं त्या म्हणतात. देशातल्या बहुतांश नागरिकांना अजूनही आपल्या पाककौशल्याबद्दल शंका वाटत असून, त्याबद्दल आत्मविश्वास वाटत नाही. अनेत जण असं म्हणतात, की जेव्हा आपण योग्य प्रमाणात सारे घटक वापरतो, तेव्हा खाद्यपदार्थ चांगले बनतात. ब्रिटनमधल्या 18 टक्के नागरिकांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून पाहिले. 26 टक्के नागरिकांनी आपण अत्यंत वाईट कुक असल्याचं सांगितल, तर 27 टक्के नागरिकांमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्याबद्दल पुरेसा आत्मविश्वास नव्हता.
First published:

Tags: Britain, Cuisine, Food, Indian cuisine, Lifestyle, Recipie

पुढील बातम्या