मेड इन इंडिया कोरोना लशीबाबत GOOD NEWS; मोदी सरकार COVAXIN लाँच करण्याच्या तयारीत

मेड इन इंडिया कोरोना लशीबाबत GOOD NEWS; मोदी सरकार COVAXIN लाँच करण्याच्या तयारीत

पहिली भारतीय कोरोना लस (corona vaccine) लवकरच लाँच होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर : ऑक्सफोर्डच्या (Oxford university) कोरोना लशीपाठोपाठ (Corona vaccine) मेड इंडिया कोरोना लशीबाबतही खूशखबर मिळते आहे. मोदी सरकार भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन (COVAXIN) लस लाँच करण्याच्या तयारीत आहे. पुढील वर्षात फेब्रुवारीमध्येच ही लस लाँच केली जाऊ शकते, अशी माहिती सरकारी वरिष्ठ शास्त्रज्ञानं दिली आहे.

भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) तयार केलेली ही लस. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. याच महिन्यात हे ट्रायल सुरू झालं आहे. सुरुवातीला ही लस पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याआधीच ही लस लाँच केली जाणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य रजनी कांत यांनी दिली आहे.

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार रजनी कांत म्हणाले, "लशीचा परिणाम चांगला दिसून आला आहे. प्राण्यांवरील चाचणी आणि माणसांवरील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. तशी ही लस सुरक्षित आहे मात्र तरी तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होईलपर्यंत 100% हमी देऊ शकत नाही"

हे वाचा - आता उरले काही दिवस; पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटनं सांगितलं कधी मिळणार कोरोना लस

"पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्चमध्येच ही लस उपलब्ध होईल. गरज पडल्यास या लशीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचाही सरकार विचार करत आहे", असंही कांत यांनी सांगितलं.

असं झालं तर कोवॅक्सिन ही लाँच होणारी पहिली भारतीय कोरोना लस असेल. दरम्यान भारत बायोटेकनं यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिली नाही आहे.

भारतात तीन कोरोना लशी तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारत बायोटेकची कोवॅक्सिन, झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीची ZyCoV-D या लशींचा समावेश आहे. तसंच हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड (Biological E Ltd) कंपनीने कोरोना लसही तयार आहे. ज्या लशीच्या  पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे.

हे वाचा - Good News: राज्यात कोरोनारुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, मृत्यूदरातही घट

याशिवाय भारताची भागीदारी असलेल्या ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनका-सीरम इन्स्टिट्युटची Covishield लशीकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ही लस जानेवारीत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल अशी शक्यता आहे.

Published by: Priya Lad
First published: November 5, 2020, 8:45 PM IST

ताज्या बातम्या